Gyanvapi Masjid Case Update Dainik Gomantak
देश

ज्ञानवापी मशीद प्रकरणी हायकोर्टात सुनावणी पूर्ण, सर्वेक्षणाबाबतही निर्णय

न्यायालयाचे आयुक्त बदलण्यात यावेत अशी मागणी

दैनिक गोमन्तक

अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. ज्ञानवापी-श्रृंगार गौरी प्रकरणी न्यायालयाच्या आयुक्तांच्या हकालपट्टीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली आहे. याप्रकरणी न्यायालय गुरुवारी (12 मे) दुपारी 12 वाजता निकाल देणार आहे. यासोबतच सर्वेक्षणाच्या तारखेबाबतही न्यायालय आपला निर्णय देणार आहे. (Gyanvapi Masjid Case Update)

शृंगार गौरी प्रकरणात, अंजुमन इनानिया मस्जिद समितीने न्यायालय नियुक्त वकील आयुक्त अजय कुमार मिश्रा यांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाचे आयुक्त बदलण्यात यावेत, अशी त्यांची मागणी होती.

बुधवारी या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाचे आयुक्त प्रामाणिकपणे आपले काम करत असल्याचे हिंदू पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. मुस्लीम पक्षाकडून या प्रकरणाला दिरंगाई करण्यासाठी अशी याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाचे आयुक्त बदलण्याची मागणी करण्यात आल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले.

सर्वेक्षणाद्वारे पुरावे गोळा करता येणार नाहीत, असे अंजुमन इनाजानिया मस्जिद समितीच्या वतीने सुनावणीदरम्यान सांगण्यात आले. त्यांच्यावतीने पाच वकील असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला, तर दोन जणांना पाहणीसाठी प्रवेश दिला गेला. तसेच, फिर्यादीचे 12 वकील आवारात उपस्थित होते, असा आरोप त्यांच्या वतीने करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT