Uttar Pradesh Crime Dainik Gomantak
देश

"सॉरी मम्मी-पापा, आम्ही गेम सोडू शकत नाही," ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी 3 सख्या बहिणींनी मृत्यूला कवटाळलं; रात्री 2 वाजता संपवलं जीवन

Online Game Addiction: या तिन्ही बहिणींना 'कोरियन लव्हर' नावाच्या एका ऑनलाइन टास्क-बेस्ड गेमचे व्यसन लागले होते.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली, जिथे तीन सख्या अल्पवयीन बहिणींनी एकाच वेळी नवव्या मजल्यावरुन उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली. टीला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'भारत सिटी' सोसायटीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. या तिन्ही बहिणींना ऑनलाइन गेमिंगचे प्रचंड व्यसन जडले होते आणि याच व्यसनातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

16 वर्षीय निशिका, 14 वर्षीय प्राची आणि 12 वर्षीय पाखी अशी या मृत मुलींची नावे आहेत. या घटनेने केवळ गाझियाबादच नव्हे, तर संपूर्ण देश हादरुन गेला असून ऑनलाइन गेमिंगचे व्यसन मुलांच्या जीवावर कसे बेतू शकते, याचे हे भयाण वास्तव समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही बहिणींना 'कोरियन लव्हर' नावाच्या एका ऑनलाइन टास्क-बेस्ड गेमचे व्यसन लागले होते. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असताना त्यांच्या हातात मोबाईल आला आणि तेव्हापासून त्यांना हे गेमिंगचे वेड लागले. तासनतास मोबाईलमध्ये मग्न राहणाऱ्या या मुलींना त्यांच्या वडिलांनी वारंवार टोकले होते आणि गेम न खेळण्यावरुन त्यांना ओरडलेही होते.

याच रागातून आणि गेमच्या प्रभावातून या मुलींनी रात्रीच्या सुमारास टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या खोलीत आई-वडिलांसाठी एक सुसाईड नोट आणि डायरी सोडली होती. "सॉरी मम्मी-पापा, आम्ही गेम सोडू शकत नाही," असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले होते. तसेच आपल्या डायरीमध्ये या व्यसनाबद्दल सविस्तर लिहून ठेवल्याचेही त्यांनी नमूद केले.

पहाटे दोनच्या सुमारास जेव्हा संपूर्ण सोसायटी गाढ झोपेत होती, तेव्हा या तिन्ही बहिणींनी नवव्या मजल्यावरुन एकत्र उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. सहायक पोलीस आयुक्त अतुल कुमार सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात या मुलींना कोरियन गेम्सची चटक लागल्याचे आणि पालकांच्या विरोधामुळे त्या मानसिक तणावात असल्याचे समोर आले.

ही केवळ आत्महत्या नसून ऑनलाइन गेमिंग कंपन्या कशाप्रकारे लहान मुलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करतात, याचा पोलीस (Police) आता गांभीर्याने तपास करत आहेत. पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाईल वापराकडे आणि त्यांच्या वागणुकीतील बदलांकडे लक्ष देणे किती गरजेचे आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT