Double Murder Case Dainik Gomantak
देश

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Uttar Pradesh Double Murder Case: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या वीर नगर परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या वीर नगर परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली. क्षुल्लक कौटुंबिक वादातून दोन पोटच्या मुलांनीच आपल्या वृद्ध आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला करुन त्यांची निर्घृण हत्या केली. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दांपत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने संपूर्ण वीर नगर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

मिळालेल्या माहितीनुसार, वीर नगर येथील रहिवासी गंगाशरण आणि त्यांची पत्नी विमलेश यांचे त्यांचा मुलगा दीपक आणि ललित यांच्याशी कोणत्यातरी घरगुती कारणावरुन वाद झाला होता. हा वाद पाहता पाहता इतका वाढला की, दोन्ही मुलांचा राग अनावर झाला. रागाच्या भरात दीपक आणि ललित यांनी घरात ठेवलेल्या जड वस्तू आणि काठ्यांनी आपल्याच माता-पित्यांवर वार करण्यास सुरुवात केली. दांपत्याचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले, परंतु तोपर्यंत दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले होते.

स्थानिक नागरिकांनी तात्काळ 'डायल-112' वर कॉल करुन घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस (Police) ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या गंगाशरण आणि विमलेश यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवले, मात्र डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी मुलगे दीपक आणि ललित यांना ताब्यात घेतले. गाझियाबादच्या ग्रामीण भागाचे डीसीपी सुरेंद्र नाथ तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी भावांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, कौटुंबिक कलह आणि संपत्तीच्या वादासह सर्व संभाव्य कोनांतून पोलीस तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT