Uttar Pradesh News Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh News: मुलाचा गुपित ठेवलेला आजार लग्नात आला समोर, नवरीने थेट लग्नच मोडले

उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका तरुणीने भरमंडपात लग्नास नकार दिला आहे. खरे तर द्वारचार्‍यादरम्यान वधूच्या भावाने वराला पैसे मोजायला दिले, पण त्याला पैसे मोजता आले नाही. याबाबत तरुणीला माहिती मिळताच तिने एका अशिक्षित मुलाशी लग्न करण्यास नकार दिला. यानंतर दोन्ही कुटुंबात वाद झाला. पोलिसांनी (Police) दोन्ही कुटूबांना पोलीस ठाण्यात आणले आणि या दोन्ही कुटूबांमध्ये कोणत्याही प्रकारची देवाण-घेवाण होणार नाही असे ठरले होते.

दुर्गुपूर गावात राहणाऱ्या मुलीचे लग्न तीन महिन्यांपूर्वी मैनपुरी पोलिस स्टेशन बिच्मा येथील बबिना सारा गावातील अमनसोबत निश्चित झाले होते. गुरुवारी सायंकाळी मुलाकडची वरात आली. रात्री एक वाजण्याच्या सुमारास द्वारचा विधी सुरू झाला. वरात अशिक्षित असल्याचा संशय मुलीच्या भावाला आला. भावाने 2100 रुपये दिले आणि पंडितजींना वराला मोजायला सांगितले. मुलाला पैसे मोजता आले नाहीत. ही गोष्ट मुलीच्या भावाने कुटुंबीयांना सांगितली.

  • मी अशिक्षित मुलाशी लग्न करणार नाही

मुलीने सांगितले की, ही माझ्या आयुष्याबाबत मोठी गोष्ट आहे. मी अशिक्षित मुलाशी लग्न करणार नाही. मुलीच्या आईने सांगितले की, माझी मुलगी हायस्कुलमध्ये शिकलेली आहे.

पोलिस ठाण्यात अनेक तास पंचाईत सुरू होती. खर्चाबाबत दोन्ही बाजू बोलत राहिल्या. केलेल्या खर्चाचा कोणताही व्यवहार करणार नाही, असे ठरले. वधू-वर पक्षाला रिकाम्या हाताने परतावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT