Raj Thackeray  Dainik Gomantak
देश

मनसे म्हणतंय चला अयोध्या; उत्तर प्रदेश भाजप मात्र विरोधाच्या पावित्र्यात

केंद्र स्थरावर भाजप काय भुमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष

दैनिक गोमन्तक

राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत पुन्हा भोंगा आणि हनुमान चीलीसा मुद्यावरुन पुन्हा एकदा राज्य सरकारला सुनावलं होतं. या भुमिकेचं काहीसं समर्थन करताना भाजप नेते दिसत होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली होती. इतकं तणावपुर्ण वातावरण महाराष्ट्रात तयार झालं होत. महाराष्ट्रात राजकिय घडामोडींना वेग आला होता. मात्र सद्या 'चला अयोध्येला' अशी बॅनरबाजी मनसे करत असताना उत्तर प्रदेश भाजप मात्र विरोधाच्या पावित्र्यात आहे. ( Uttar Pradesh BJP opposes Raj Thackeray's visit to Ayodhya )

राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर मनसेकडून ठिकठिकाणी 'चला अयोध्येला' अशी बॅनरबाजी करण्यात येत आहे. अयोध्या दौऱ्याची पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याआधी भाजपा नेते पुन्हा एकदा कडाडले असून त्यांनी सर्वत्र बॅनर लावले आहेत. यामध्ये राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा परत जा असं म्हटलं आहे. यासोबत त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून देखील एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये 5 जूनला चलो अयोध्या महाअभियान आयोजित करणार असल्याचं म्हटलं आहे.

मात्र राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी असंही ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना भेटू नका, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा काहीही संबंध नाही असं देखील ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे. त्यामुळे केंद्र स्थरावर भाजप काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saptakoteshwar Temple History: शिल्पावशेषांतून उलगडतोय दिवाडीच्या सप्तकोटेश्वर मंदिराचा इतिहास; कदंब स्थापत्याला नवा उजाळा

Iran America Conflict: "हबीबी, इराणला या!" युद्धाच्या धमकीवर तेहराननं उडवली ट्रम्पची खिल्ली; 3 डी गेमचा VIDEO केला शेअर

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; सुप्रीम कोर्टाचा 'MACP' संदर्भात महत्त्वाचा निर्णय

DJ Controversy: पुण्यात 'DJ'चा सवाल; गोव्यात नरकासुराचे काय?

Guru Gochar 2026: करिअरमध्ये मोठी झेप अन् छप्परफाड पैसा! गुरुच्या नक्षत्र परिवर्तनानं 4 राशी होणार मालामाल; गोल्डन टाईम सुरु

SCROLL FOR NEXT