Delhi High Court Dainik Gomantak
देश

न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा बनले दिल्ली उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश

तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा यांची बदली करुन त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Delhi High Court : देशातील सहा उच्च न्यायालयांना रविवारी त्यांचे मुख्यन्यायाधीश मिळाले. यापैकी पाच न्यायाधीशांना मुख्य न्यायाधीशपदी बढती मिळाली आहे. तर तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा यांची बदली करुन त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करण्यात आले आहे. केंद्रीय कायदे मंत्रालयाच्या वतीने ट्विट करुन ही माहिती देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने गेल्या महिन्यापूर्वी त्यांच्या नावांची शिफारस केली होती.

मंत्रालयाच्या कायदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाचे (Delhi High Court) न्यायमूर्ती विपिन सांघी यांना उत्तराखंडचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले आहे. त्याचवेळी मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) न्यायमूर्ती अमजद ए सय्यद यांची हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दुसरीकडे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एसएस शिंदे यांना राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले आहे, तर गुजरात उच्च न्यायालयाच्या आरएम छाया यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करण्यात आले आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्वल भुईया यांना या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले आहे.

तसेच, 13 मार्च रोजी न्यायमूर्ती डीएन पटेल निवृत्त झाल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात नियमित मुख्य न्यायाधीशांचे पद रिक्त होते. न्यायमूर्ती सांघी हे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून जबाबदारी पाहत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Accidents: गोव्यात दरमहा 23 जणांचा होतोय अपघाती मृत्यू ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती, दररोज 8 रस्ते अपघातांची नोंद

VIDEO: फलंदाजीत अपयश, पण गोलंदाजीत सुपरहिट! अभिषेक शर्माने रचला इतिहास; टी-20 क्रिकेटमध्ये 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

वेर्ण्यात भीषण दुर्घटना! धावत्या मिनी टेम्पोवर कोसळली उच्चदाब वीजवाहिनी; 30 वर्षीय क्लिनरचा जागीच मृत्यू

Horoscope: शनीची उलटी चाल ठरणार निर्णायक! 'या' राशींवर पैशांचा वर्षाव, तर काहींना होऊ शकतो आर्थिक फटका

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

SCROLL FOR NEXT