Using foul language on Twitter? Your account may be suspended Dainik Gomantak
देश

Twitterवर शिव्या देत असाल तर आता तुमचे अकाऊंट होणार block

ट्विटरवर (Twitter) शिव्या देणे आता महागात पडणार आहे

दैनिक गोमन्तक

मायक्रोब्लॉगिंग साइट (Microblogging) ट्विटरवर (Twitter) वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे, कारण ट्विटरवर शिव्या देणे आता महागात पडणार आहे. खरं तर, ट्विटर अशा फीचरची चाचणी घेत आहे, ज्याच्या आगमनानंतर जर कोणी चुकीची भाषा वापरली तर त्याचे खाते सात दिवसांसाठी ब्लॉक केले जाऊ शकते. 'सेफ्टी मोडच्या'(Safety Mode)नावाने येणाऱ्या या फीचरचा उद्देश ट्विटरच्या अपमानास्पद वापराला आळा घालणे आहे.(Using foul language on Twitter? Your account may be suspended)

ट्विटरनुसार, प्लॅटफॉर्मवर असभ्य भाषेत टिप्पणी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. हे नवीन सुरक्षा वैशिष्ट्य सध्या IOS आणि Android प्लॅटफॉर्मच्या निवडक वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आले आहे, तर लवकरच ते सर्व वापरकर्त्यांसाठी आणले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमीनुसार, ट्विटरचे हे विशेष वैशिष्ट्य सुरुवातीला केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल. ट्विटरने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की कंपनी एक नवीन वैशिष्ट्य घेऊन येत आहे जे वापरकर्त्यांसाठी एक चांगली भावना निर्माण करणार आहे . या फीचरच्या मदतीने त्या लोकांना दिलासा मिळेल जे लोक प्लॅटफॉर्मवर शिव्या पाहून परेशान झाले आहेत किंवा ज्या लोकांना अशी भाषा आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नको वाटत असते.

ट्विटरचे हे नवीन फिचर वापरण्यासाठी, वापरकर्त्यांना सेटिंग्जमध्ये जाऊन ते चालू करावे लागेल. यानंतर, ट्विटरची प्रणाली नकारात्मक प्रतिबद्धतेची तपासणी करेल. या फीचरच्या मदतीने ट्विटर ट्विट कंटेंट आणि ट्वीट आणि रिप्लाय करणाऱ्या वापरकर्त्यांमधील संबंधांवर देखील नजर ठेवेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

UTAA: ‘उटा’ 8 संघटनांनी एकत्र येऊन स्‍थापलेली संस्‍था नव्‍हे! ती 14 व्यक्तींनी केलेली सोसायटी; प्रकाश वेळीप यांचा दावा

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

SCROLL FOR NEXT