Honeytrap Dainik Gomantak
देश

Honeytrap: अश्लील व्हिडीओ बनवून करायची ब्लॅकमेल, राजकारण्यांनाही बनवले शिकार; अखेर...

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात आणखी एक हनी ट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात आणखी एक हनी ट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तरुणी अज्ञात लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायची.

यानंतर ती ब्लॅकमेल करायची. अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग करुन या तरुणीने लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आता बरेली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकवून लोकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणात हनी ट्रॅप टोळीने अनेक इन्स्पेक्टर आणि राजकारण्यांनाही आपले शिकार बनवल्याची माहिती पोलिसांना (Police) मिळाली आहे.

दरम्यान, तरुणी आधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करायची. त्यानंतर ती तरुणांना मित्र म्हणून निर्जन ठिकाणी बोलावून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करत असे. यादरम्यान, तिचा मित्र मोबाईलवरुन व्हिडिओ बनवत असे.

त्यानंतर त्यांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग सुरु करायची. तरुणीने आतापर्यंत 3 जणांना आपला बळी बनवले आहे. तसेच एका तरुणाकडून पैसे आणि मोटारसायकल हिसकावून घेतली.

या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल होताच या प्रकरणाचा तपास सुरु झाला. तरुणीला अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले. त्याचवेळी पोलिस तरुणीच्या मित्राचा शोध घेत आहेत.

अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करायची

बरेलीचे एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी सांगितले की, सीबीगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणारी पूनम मौर्या तिच्या फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम अकाउंटवर तरुणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री करत असे.

त्यानंतर ती तरुणांना अश्लील फोटो पाठवायची. यानंतर ती त्यांना निर्जन ठिकाणी बोलावून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करत असे. यादरम्यान, तिचा मित्र दिलशाद फोटो आणि व्हिडिओ बनवायचा.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायची

दुसरीकडे, पीडिताला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून पोलिसात तक्रार करण्याची धमकी देण्यात आली. यासोबतच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली.

तरुणी 50 हजार ते एक लाख रुपये मागायची. पैसे न दिल्यास फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायची. अशाप्रकारे अतापर्यंत या तरुणीने 3 जणांना आपला बळी बनवले आहे.

पोलिस तरुणीचा मित्र दिलशादचा शोध घेत आहेत

याप्रकरणी एका तरुणाने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तरुणी आणि तिच्या मित्राने मोटारसायकल, मोबाईल आणि पैसे घेऊन गेल्याचा आरोप त्याने केला. त्यानंतरही त्याला ब्लॅकमेल केले जात आहे.

या हनी ट्रॅप प्रकरणी आणखी काही लोकांनी बरेलीचे एसएसपी प्रभाकर चौधरी यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी तरुणीला अटक करुन कारागृहात पाठवले. तर पोलिस आता तिच्यासोबत राहणाऱ्या दिलशादचा शोध घेत आहेत.

यापूर्वी पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला होता

काही दिवसांपूर्वी शहरातील बारादरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हनी ट्रॅप टोळीचा पर्दाफाश झाला होता. ही टोळी बरेली आणि इतर जिल्ह्यातील पोलिस, राजकारणी आणि व्यापारी यांना आपला शिकार बनवत असे.

ती मोबाईलद्वारे लोकांना घरी बोलावून त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळत असे. एक पोलिस उपनिरीक्षकही तिचा बळी ठरला आहे. पोलिसांनी या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करुन गुन्हा दाखल केला आहे. सध्या टोळीचा म्होरक्यासह अन्य आरोपी फरार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT