Uma Bharti  Dainik Gomantak
देश

Uma Bharti: 'भगवान राम अन् हनुमान हे भाजपचे कॉपीराइट...', भारतींच्या वक्तव्याने BJP अडचणीत

Madhya Pradesh News: भाजप नेत्या उमा भारती यांच्या वक्तव्यामुळे पक्षाच्या अडचणीत वाढ होत आहे.

दैनिक गोमन्तक

Uma Bharti Profile: भाजप नेत्या उमा भारती यांच्या वक्तव्यामुळे पक्षाच्या अडचणीत वाढ होत आहे. अलीकडे, त्यांनी भाजप समर्थकांना सांगितले की, त्यांनी "आजूबाजूला पाहावे" आणि कोणाला मत द्यायचे ते ठरवावे. आता त्यांच्या आणखी एका विधानाने खळबळ उडाली आहे. भगवान राम आणि हनुमान हे भाजपचे कॉपीराइट नाहीत, असे उमा भारती म्हणाल्या आहेत.

दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या वतीने राज्यात हनुमान मंदिर उभारणीच्या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य केले. दारुबंदीच्या मागणीसाठी त्या शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला घेरत आहेत. नुकतेच मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) दारुबंदीच्या मागणीसाठी दारुच्या ठेक्यांवर दगडफेक केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या, तेव्हाही उमा भारती चर्चेत आल्या होत्या.

उमा भारती या राज्यातील बड्या नेत्या आहेत

उमा भारती या मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री राहिल्या आहेत. त्याचबरोबर त्या राज्यातील बड्या नेत्यांपैकी एक मानल्या जातात. वृत्तानुसार, पक्षाच्या हायकमांडने बाजूला सारल्यामुळे त्या नाराज आहेत. त्यांनी भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन केले होते. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटले होते की, 'हिंदूंनी त्यांच्या घरात शस्त्रे ठेवावीत.'

प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचे समर्थन केले

यापूर्वी, उमा भारती म्हणाल्या होत्या की, 'प्रभू रामानेही वनवासात शस्त्र न सोडण्याची शपथ घेतली होती. शस्त्र बाळगणे हे चुकीचे नाही, पण हिंसक विचार असणे चुकीचे आहे.' छिंदवाडा येथे उमा भारती यांनी हे वक्तव्य केले असून, प्रज्ञा ठाकूर यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये भडकाऊ भाषणे केली आहेत.

दुसरीकडे, 'पठाण' चित्रपटावरुन (Movie) झालेल्या गदारोळावर उमा भारती यांनी निषेधाची गरज काय असा सवाल उपस्थित केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, 'सेन्सॉर बोर्डाने आक्षेपार्ह दृश्ये तात्काळ हटवावीत. यात राजकारण करण्याची गरज नाही.'

त्या पुढे म्हणाल्या होत्या की, 'एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावणारी दृश्ये हटवली पाहिजेत. भारत कोणत्याही रंगाचा अपमान सहन करणार नाही. भगवा ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे, सेन्सॉर बोर्डाने ही दृश्ये त्वरित हटवावीत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT