UPSC Result 2023
UPSC Result 2023 Dainik Gomantak
देश

UPSC Result : दोन आयेशा, रोल नंबर एकच, 184 व्या रॅंकवर दोघींचाही दावा

गोमन्तक डिजिटल टीम

UPSC Resul 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मंगळवारी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. मध्य प्रदेशमध्ये यूपीएससीच्या निकालाबाबत एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 

एकाच रोल नंबरवर दोन मुलींनी परीक्षा दिली, मुलाखत दिली आणि आता दोघांनी 184 वा क्रमांक मिळवला आहे. या दोन्ही उमेदवारांनी आता या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या घरी सेलिब्रेशन सुरू आहे.

देवासच्या आयेशा फातिमा हिला 184 वा क्रमांक मिळाला आहे. दुसरीकडे अलीराजपूर जिल्ह्यातील आयेशा मक्राणी हिलाही 184 वा क्रमांक मिळाला आहे.या रॅंकवर दावा करणाऱ्या दोन्ही उमेदवारांचा रोल नंबर एकच असल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे.

प्रवेशपत्रात फक्त एक रोल नंबर ७८११७४४ नमूद आहे. दोघींना एकच रोल नंबर कसा मिळाला हा मोठा प्रश्न आहे. यामध्ये एका प्रकरणात खोटारडेपणा होण्याची शक्यता आहे. मात्र, या दोघांनी परीक्षा दिल्याचा दावा, मुलाखत दिल्याचा पुरावाही सादर केला जात आहे.  

आयेशा मकरानीचा भाऊ शाहबाजुद्दीन मकरानी (अलीराजपूर) चा दावा आहे की त्याच्या बहिणीने खूप मेहनत केली होती. बहिणीने आयएएस व्हावे, असे आईचे स्वप्न होते. तीली 184 वा क्रमांक मिळाला आहे. यामध्ये अन्याय झाल्यास न्यायालयातही जाणार आहोत. 

 दुसरीकडे, देवासच्या आयेशा फातिमाचे वडील नजीरुद्दीन यांनीही दावा केला आहे की, त्यांच्याच मुलीची निवड झाली आहे. UPSC अशी चूक करू शकत नाही. मी रात्रीला दिवस मानेन, पण ते असे असणे स्वीकारू शकत नाही. मला वाटतं की दुसऱ्या आयेशाची काहीतरी चूक आहे.

 हे प्रकरण तपासानंतर स्पष्ट होणार असले तरी दोन्ही कुटुंब मात्र आनंदात मग्न आहेत. यूपीएससीसारख्या परीक्षेत एकच रोल नंबर देणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रोल नंबर बनावट निघण्याची शक्यता आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Goa Today's Live News Update: पणजी कधीच सोडणार नाही, अनेकांची स्वप्न ही स्वप्नच राहतील! मोन्सेरात

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

Watch Video: लंडनमध्ये PM मोदींची धूम! रन फॉर मोदी आणि फ्लॅश मॉब कार्यक्रमाचं भव्य आयोजन; भारतीय समुदायानं...

SCROLL FOR NEXT