Crime  Dainik Gomantak
देश

यूपीत दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार; जबरदस्तीने गोमांस खायला लावत, होणाऱ्या नवऱ्याला पाठवला Video

Uttar Pradesh crime: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका दलित तरुणीवर मादक पदार्थ असलेले कोल्ड ड्रिंक पाजून सामूहिक बलात्कार करण्यात आला.

Manish Jadhav

Uttar Pradesh crime: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका दलित तरुणीवर मादक पदार्थ असलेले कोल्ड ड्रिंक पाजून सामूहिक बलात्कार करण्यात आला. एवढेच नाही तर तिला गोमांस खाण्यास भाग पाडले.

या गुन्ह्यात पीडितेच्या एका मुस्लिम मित्राचाही सहभाग होता. 30 हजार रुपयांचे कर्ज परत करण्याच्या बहाण्याने त्याने पीडितेला हॉटेलमध्ये बोलावले होते.

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, जेव्हा पीडिता मित्रावर विश्वास ठेवून हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा तिथे आधीच असलेल्या दोन मुस्लिम तरुणांनी तिला गोमांस खाण्यास भाग पाडले आणि नंतर तिला मादक पदार्थ असलेले कोल्ड ड्रिंक पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

दरम्यान, पीडितेने व्हिडिओ बनवल्याचा आरोप केला आहे. या व्हिडिओच्या मदतीने तिघांनी ब्लॅकमेलिंग सुरु केले. त्यांनी पीडितेकडे 50 हजार रुपयांची मागणी केली.

मात्र ती पैशांची व्यवस्था करु न शकल्याने हा व्हिडिओ आरोपींनी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवला. दुसरीकडे, पोलिसांनी (Police) आरोपी शिफत, शोएब आणि नाजिम यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून त्यांना अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

न्यूज एजन्सी आयएएनएसने एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, प्रेमनगर पोलीस सर्कलमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने तिच्या मित्राला 30,000 रुपये दिले होते. 1 सप्टेंबर रोजी पैसे परत करण्याच्या बहाण्याने तरुणीला तिच्या मित्राने हॉटेलमध्ये बोलावले.

अहवालात म्हटले आहे की, हॉटेलच्या खोलीत पीडितेचा मित्र शिफत आणि त्याचे दोन सहकारी नाजिम आणि शोएब यांनी तिला जबरदस्तीने गोमांस खाऊ घातले आणि नंतर तिला मादक पदार्थ असलेले कोल्ड ड्रिंक जबदस्तीने पाजले.

बेशुद्ध पडल्यानंतर गँगरेप

ती बेशुद्ध पडल्यानंतर आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला, तर शिफतने या लज्जास्पद कृत्याचा व्हिडिओ बनवला. नंतर त्यांनी पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. एकतर 50 हजार रुपये दे अन्यथा व्हिडिओ व्हायरल करु, अशी धमकीही दिली.

IANS नुसार, ही घटना उघडकीस आली जेव्हा पीडितेचा मित्र शिफतने हा अश्लील व्हिडिओ तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवला, ज्याने पुढे पोलिसांना याची माहिती दिली.

एक आरोपी बी फार्माचा विद्यार्थी

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार आरोपी शोएब हा बी फार्माचा विद्यार्थी (Student) आहे, तर नाजिम हा सलूनमध्ये काम करतो. तिघांची योजना काश्मीरला पळून जाण्याची होती, जिथे नाजिमचे दुकान आहे.

बरेलीचे एसपी राहुल भाटी यांनी सांगितले की, एससी/एसटी कायद्यासह आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT