Brijesh Singh Twitter
देश

UP: माफिया ब्रिजेश सिंगला मोठा दिलासा, मुख्तार अन्सारीच्या ताफ्यावर हल्ला केल्याप्रकरणी जामीन मंजूर

अलाहाबाद उच्च न्यायालयाने ब्रिजेश सिंह उर्फ ​​अरुण सिंहचा जामीन अर्ज स्वीकारला असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

UP Allahabad High Court: उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून बुधवारी माफिया ब्रिजेश सिंहला मोठा दिलासा मिळाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ब्रिजेश सिंह उर्फ ​​अरुण सिंहचा जामीन अर्ज स्वीकारला असल्याचे सांगण्यात येत आहे. अरुण सिंगची जामिनावर सुटका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुख्तार अन्सारीच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती आणि आता जामीन मिळाला आहे. (Brijesh Singh)

ब्रिजेश सिंगला मोठा दिलासा देत अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. ब्रिजेश सिंगवर दाखल झालेल्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये निर्दोष मुक्तता झाल्याचे सांगण्यात येत आहे. इतर प्रकरणांमध्येही जामीन मंजूर झाला आहे. उच्च न्यायालयाने गुरुवारी काही अटींसह हा जामीन मंजूर केला आहे.

काय प्रकरण आहे?

ब्रिजेश सिंहचे वकील सूरज सिंह यांनी गुरुवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात युक्तिवाद केला, त्यानंतर न्यायालयाने ब्रिजेशला दिलासा दिला. हे प्रकरण 2001 मध्ये माफिया मुख्तार अन्सारीच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंबधी आहे. ज्यामध्ये ब्रिजेश सिंहला अटक करण्यात आला आहे.

उसरी चाटी प्रकरणात मुख्तार अन्सारी यांनी नामनिर्देशित अहवाल दाखल केला होता. या प्राणघातक हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. मुख्तार अन्सारी यांना या प्रकरणी ब्रिजेश सिंह आणि त्रिभुवन सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. गाझीपूर जिल्ह्यातील मोहम्मदाबाद पोलीस ठाण्याच्या उसरी चट्टी येथे ही घटना घडली होती.

आता या प्रकरणात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने ब्रिजेश सिंह यांचा जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी ब्रिजेश सिंगचा पहिला जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. दुसऱ्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने माफिया ब्रिजेश सिंगला दिलासा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कंडोमवरचा टॅक्स कमी करा; पाकिस्तानने IMF समोर पुन्हा पसरले हात, पदरी पडली निराशा

Bharat Taxi: रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि सुरक्षित प्रवास; केंद्र सरकार लाँच करणार 'भारत टॅक्सी' अ‍ॅप, ओला-उबरला टक्कर

Bangladesh Violence: बांगलादेशात माणुसकीला काळिमा! हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झाडाला टांगून जाळला Watch Video

Margao: मडगावात पादचारी पूल बंद! टॅक्सीचालक, दुकानदारांमध्ये नाराजी; साबांखा मंत्र्यांनी केली पाहणी

Goa Liberation Day: 'ऑपरेशन विजय'च्या शूरवीरांना सलाम! राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांकडून 'गोवा मुक्ती दिना'च्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT