EVM Dainik Gomantak
देश

फेविक्विकने ईव्हीएम पॅक, 'सपा'ला मतच जाईना; निवडणूक आयोगाकडे तक्रार

लखीमपूर खेरीमध्ये 8 जागांवर मतदान होत आहे.

दैनिक गोमन्तक

लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) जिल्ह्यातील सदर विधानसभेच्या मतदानादरम्यान एक विचित्र प्रकार समोर आला आहे. लखीमपूर सदर विधानसभा मतदारसंघातील कादीपूर सानी मतदान केंद्रावर (Polling Booth) बसवलेल्या ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये एका समाजकंटकाने फेविक्विक टाकले. त्यामुळे सुमारे दीड तास मतदान खोळंबले होते.

माजी आमदार आणि समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) उमेदवार उत्कर्ष वर्मा यांनी आपले मत व्यक्त केले.'आमच्या पहिल्या क्रमांकाच्या बटणावर कोणीतरी मुद्दाम फेविक्विक लावले, त्यामुळे बटण दाबले जात नव्हते, आम्ही तक्रार केली, त्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) कारवाई केली, आणि आता मतदान सुरू झाले. मात्र या संपुर्ण प्रकारामुळे सुमारे दीड तास मतदान थांबले होते. आम्ही अशी मागणी करतो की ज्या व्यक्तीने हे कृत्य केले आहे त्याच्यावर कारवाई केली जावी, त्याने केलेला हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असेल त्यामुळे पुर्ण तपास करून हे कृत्य करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी,' उत्कर्ष वर्मा यांनी केली आहे.

इथे सकाळपासून मतदान सुरू होते, आम्ही रांगेत उभे होतो तेव्हा कोणीतरी सांगितले की ईव्हीएमवर फेविक्विक टाकण्यात आले आहे, सपाचे बटण दबत नाही, आम्ही सुमारे तासभर रांगेत उभे आहोत. आणि दोन तासापासून अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे मतदान केंद्रावर रांगेत उभ्या असलेल्या एका मतदाराने सांगितले. लखीमपूर खेरीमध्ये 8 जागांवर (पलिया, निघासन, गोला गोरखनाथ, श्रीनगर, धौरहरा, लखीमपूर, कास्ता आणि मोहम्मदी) मतदान होत आहे. यावेळी टिकुनिया हिंसाचार हा मुद्दा कायम आहे. या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.

लखीमपूरचे खासदार आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या परिसरातही मतदान सुरू आहे, जिथे त्यांचा मुलगा आशिष मिश्राचे भविष्य जनता त्यांचे ईव्हीएममध्ये कैद करत आहे. शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्या या घटनेनंतर भाजपचा मार्ग या मतदारसंघात कठीण झाला आहे. येथे सोपा नाही. टिकुनिया हिंसाचार प्रकरणात विरोधक सातत्याने भाजपला गोत्यात आणत आहे ज्यामुळे या ठिकाणी भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT