Traffic Rules Dainik Gomantak
देश

पंजाबमध्ये अनोखे ट्रॅफिक नियम! दारू पिऊन गाडी चालवल्यास शाळेत द्यावे लागणार लेक्चर

पंजाबमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना अनोखी शिक्षाही निश्चित करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

पंजाबमध्ये (Punjab) वाहतूक विभागाने नवीन वाहतूक नियमांबाबत अधिसूचना जारी केली. यामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना अनोखी शिक्षाही निश्चित करण्यात आली. यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल लोकांना केवळ भरघोस दंड भरावा लागणार नाहीये, तर रक्तदान करण्यापासून 9वी ते 12वीपर्यंतच्या किमान 20 विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत दोन तास शिकवण्यापर्यंत मजल मारावी लागणार आहे आणि यादरम्यान विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम देखील शिकवावे लागणार आहेत. (Unique traffic rules in Punjab If you drive drunk you will have to give a lecture in school)

नवीन नियमांनुसार, ओव्हरस्पीडने वाहन चालवल्यास प्रथमच 1000 रुपयांचे चलन तसेच 3 महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाणार आहे. तीच चूक दुसऱ्यांदा केल्यास दुप्पट दंड आकारला जाणार आहे आणि एवढेच नाही तर नियम मोडणाऱ्यांना या कालावधीत रिफ्रेशर कोर्सही करावा लागणार असून जवळच्या शाळेत विद्यार्थ्यांना दोन तास व्याख्याने द्यावी लागणार आहेत. यानंतर, गुन्हेगाराला नोडल ऑफिसरकडून प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

याशिवाय, नियम तोडण्याचा पर्याय म्हणून, समुदाय सेवेच्या अंतर्गत जवळचे रुग्णालय देखील असणार आहे. जिथे डॉक्टर किंवा प्रभारी यांनी सांगितल्याप्रमाणे सुमारे दोन तास काम करावे लागेल किंवा किमान एक युनिट रक्त दान करावे लागेल.

यासोबतच दारू पिऊन गाडी चालवल्यास किंवा मोबाईलवर बोलत असताना वाहन चालवल्यास 5000 रुपयांचे चलन आणि 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित करण्यात येणार आहे. त्याच वेळी, दंडाची रक्कम दुसऱ्यांदा 10 हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासोबतच रिफ्रेशर कोर्सेस किंवा कम्युनिटी सर्व्हिसेसही करावे लागणार आहेत. दुचाकीवर 3 प्रवाशांना बसवणाऱ्यांवरही यावेळी कडक नियम लावण्यात आले आहेत. पहिल्यांदा 1000 आणि दुसऱ्यांदा 2000 रुपये आणि परवाना निलंबनाला सामोरे जावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

SCROLL FOR NEXT