Union Minister Rajeev Chandrasekhar Dainik Gomantak
देश

Lok Sabha Election 2024: ‘’चिदंबरम यांनी भ्रष्टाचार वाढवला, आरबीआयकडून सांगण्यात यायचे...’’; राजीव चंद्रशेखर यांचा हल्लाबोल

Union Minister Rajeev Chandrasekhar: राजकीय इतिहासातील सर्वात मोठी लाजिरवाणी बाब म्हणजे पी. चिदंबरम आणि त्यांच्या काही साथीदारांनी अर्थव्यवस्थेवर केलेली टिप्पणी.

Manish Jadhav

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे भाजपला शिकस्त देण्यासाठी काँग्रेसप्रणित इंडिया अलायन्सने जोर लावला आहे. दरम्यान, आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांच्या 'जस्ट अ मर्सेनरी?: नोट्स फ्रॉम माय लाइफ अँड करिअर' या पुस्तकावर X वर प्रकाशित झालेली बातमी शेअर करताना केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर निशाणा साधला.

राजीव चंद्रशेखर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘’राजकीय इतिहासातील सर्वात मोठी लाजिरवाणी बाब म्हणजे पी. चिदंबरम आणि त्यांच्या काही साथीदारांनी अर्थव्यवस्थेवर केलेली टिप्पणी. त्यांनी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले, परंतु आरबीआयकडून सांगण्यात यायचे की, अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे.’’

RBI चे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी 'Just a Mercenary?: Notes from my life and career' नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘चिदंबरम यांनी अर्थव्यवस्थेचे चांगले चित्र दाखवण्यासाठी आरबीआयवर दबाव आणला होता.’

सुब्बाराव म्हणाले की, ‘चिदंबरम यांनी आरबीआयवर महागाईच्या वाढीव अंदाजांसह अर्थव्यवस्थेचे चांगले चित्र मांडण्यासाठी दबाव आणला होता.’ ते म्हणाले की, ‘’जर एखाद्या सरकारने जनभावना वाढवण्यासाठी अंदाज वाढवण्यास सांगितले होते. आरबीआयने आपली विश्वासार्हता जपली पाहिजे. त्याची चलनविषयक धोरणाची भूमिका चलनवाढीच्या अनुमानांवर आधारित असावी.’’

सुब्बाराव पुढे असेही म्हणाले की, ‘’भारत (India) ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, मात्र त्याचे फायदे देशातील सर्वसामान्य जनतेला मिळतील हे निश्चित केले पाहिजे. आरबीआयच्या स्वायत्ततेचा सरकार किती आदर करते हा प्रश्न आहे.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

SCROLL FOR NEXT