Dr. Harsh Vardhan Dainik Gomantak
देश

कोरोनाकाळातील कामगिरीचा डॉ. हर्ष वर्धन यांना फटका ?

कोरोना काळात डॉ. हर्ष वर्धन यांनी केलेल्या कामावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असल्याची चर्चा सुरू होती.

दैनिक गोमन्तक

मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारासाठी केंद्रीय मंत्र्याचे राजीनामासत्राला सुरूवात झाली आहे. नुककत्याच मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर त्याआधी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल, सदानंद गौडा, संतोष गंगवाल यांनी देखील आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, बाबुल सुप्रीयो, डी.व्ही सदानंद गौडा, संजय धोत्रे हे देखील राजीनामा देऊ शकतात अशा चर्चा सुरु आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्या नंतर या पदांसाठी कोणाची निवड होते यावर वेगवेळ्या चर्चा सुरु आहे. (Union Minister Harsh Vardhan has resigned)

दरम्यान, कोरोना काळात डॉ. हर्षवर्धन यांनी केलेल्या कामावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यांच्या कामामुळे सरकारची बदनामी झाल्याचेही बोलले जात होते. सध्या देशात कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असुन याकाळात आरोग्य मंत्रीपद कोणाकडे दिल जात हे आता पहाव लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT