Union Home Minister Amit Shah Dainik Gomantak
देश

Pegasus: 'आप क्रोनॉलॉजी समझिए' म्हणत अमित शहांचे स्पष्टीकरण

अमित शहा (Amit Shah) म्हणाले, "तथाकथित अहवाल समोर येण्याची वेळ आणि त्यानंतर संसदेत होणारा गोंधळ, या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे."

दैनिक गोमन्तक

केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी पत्रकार, कार्यकर्ते आणि मंत्र्यांचे फोन हॅक करण्यासाठी इस्रायली सॉफ्टवेअर पेगासस (Pegasus) वापरल्याच्या वृत्तांबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. या मुद्द्याचे स्पष्टीकरण करताना त्यांनी पुन्हा एकदा क्रोनॉलॉजी समजुन घ्या असे म्हटल्याटे दिसुन आले आहे. "लोक अनेकदा माझ्या क्रोनॉलॉजी या संकल्पनेला हलक्यात घेतात, परंतु आज आपण गंभीरपणे क्रोनॉलॉजी समजुन सांगु ईच्छितो" असे विधान अमित शाह यांनी केले आहे. (Union Home Minister Amit Shah's explanation on pegasus case)

अमित शहा म्हणाले, "तथाकथित अहवाल समोर येण्याची वेळ आणि त्यानंतर संसदेत होणारा गोंधळ, या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. ही एक विघ्नसंतोषी जागतिक संस्था आहे जी भारताची प्रगती पाहु ईच्छित नाही. त्यांना भारतीचा विकास नको आहे. ही घटना आणि एकुण घटनाक्रम समजून घेण्यासाठी भारतीय लोक खूप परिपक्व आहेत."

विरोधी पक्षांनी सोमवारी संसदेत पंतप्रक्षान नरेंद्र मोदींना आपल्या नविन सहकाऱ्यांची ओळख करुन देण्यास विरोध दर्शवला होता. यावर अमित शाह यांनी हे लोक भारताची प्रगती पाहवत नाही. तसेच पुढे ते असेही म्हणाले की, “भारताच्या नागरिकांना सध्या सुरु असलेल्या पावसाळी आधिवेशनातुन भरपुर अपेक्षा आहेत. शेतकरी, तरुण, महिला आणि समाजाच्या मागास वर्गाबद्दलच्या महत्वपुर्ण विषयांवर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT