Anant Ambani 
देश

Anant Ambani: अविश्वसनीय...! अनंत अंबानीच्या पगडीवरील ब्रोचची किंमत 160 कोटी?

Anant Ambani & Radhika Merchant Wedding: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले.

Manish Jadhav

Anant Ambani & Radhika Merchant Wedding: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. गेल्या काही दिवसांपासून या विवाहसोहळ्याची धूम सुरु होती. मुंबईमधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झालेला हा शाही विवाह सोहळा अनेक वर्ष स्मरणात राहील. अनंत आणि राधिकाच्या या शाही विवाह सोहळ्याला बॉलिवूडसह जगातील दिग्गज स्टार्संनी हजेरी लावली. विवाह सोहळ्यानंतर नवविवाहित जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. या फोटोंमध्ये दोघेही एवढे सुंदर दिसत होते की त्यांच्यावरुन नजर हटवणं मुश्किल झालं होतं.

अनंत अंबानीच्या पगडीवरील ब्रोचची किंमत 160 कोटी!

दरम्यान, अनंतच्या सोनेरी पगडीवर हिऱ्याने जडवलेली कलगी (ब्रोच) खरोखरच एक रॉयल ऍक्सेसरी होती. विरल भयानीच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार, या भव्य कलगीची किंमत तब्बल 160 कोटी रुपये आहे. अनंतने रॉयल पोशाख परिधान केला होता. अनंतचा पोशाख अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केला होता. तर अबू जानी संदीप खोसला यांनीच डिझाइन केलेल्या लाल आणि पांढऱ्या लेहेंग्यात राधिका देखणी दिसत होती.

या शाही विवाह सोहळ्यातील मेन्यूही शाही होता. हा शाही मेन्यू बनवण्यासाठी खास शेफना बोलावण्यात आले होते. सोहळ्यात खासकरुन शाकाहारी मेन्यूची खूप चर्चा झाली. शाकाहारी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी दिग्गज शेफ वर्जिलिया मार्टिनेज आणि गोव्याचे प्रसिद्ध शेफ अविनाश मार्टिन्स यांना बोलावण्यात आले होते. या दिग्गज शेफच्या देखरेखीखाली शाकाहारी मेन्यू बनवण्यात आला. अविनाश यांनी खासकरुन गोव्याच्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवून दिले. त्यांनी खास गोवन पद्धतीचे शाकाहारी पदार्थ बनवून मैफिल लुटली. अविनाश यांनी गोव्याची सुप्रसिद्ध मशरुम शागुती, ग्रील्ड स्वीट पोटॅटो, कॉर्न गॅलेट, सोल कढी, बनवले.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 15 जुलै रोजी अंबानींच्या घरातील कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक खास रिसेप्शन होणार आहे. हे खास रिसेप्शन अंबानी कुटुंबाच्या प्रवासाचा भाग असलेल्यांसोबत आनंद साजरा करण्याची संधी देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT