देश

सरकारी शाळांमध्ये जातीय वारे, दलित विद्यार्थींनीचा स्पर्श झाल्याने कुकने फेकले अन्न

देशातील कोणतीही शाळा असो, शाळेत सर्व जातीधर्माचे मुलं शिकतात. मात्र उदयपूरमधील एका सरकारी शाळेत अनुसुचीत जातीच्या विद्यार्थिनींसोबत भेदभाव केल्याची घटना समोर आली

दैनिक गोमन्तक

देशातील कोणतीही शाळा असो, शाळेत सर्व जातीधर्माचे मुलं शिकतात. मात्र उदयपूरमधील एका सरकारी शाळेत अनुसुचीत जातीच्या विद्यार्थिनींसोबत भेदभाव केल्याची घटना समोर आली आहे. या शाळेत अनुसुचीत जातीच्या विद्यार्थिनींना डाळ दिली जात असताना स्वयंपाकाने जेवण फेकले. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांनी आरोपी कुक याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. हे प्रकरण गोगुंडा ब्लॉकमधील भरोडी गावातील सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी डिंपल मेघवाल (13) आणि नीमा मेघवाल (14) या गोगुंडा येथील भरोडी गावातील सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी शाळेचा स्वयंपाकी लालूराम गुर्जर यांच्यावर भेदभाव आणि अन्न फेकल्याचा आरोप केला. मध्यान्ह भोजनांतर्गत हे जेवण देण्यात आले. दोघींनी गोगुंडा पोलिस ठाण्यात कुकविरोधात तक्रार दिली आहे.

या प्रकरणाची पुष्टी करताना उप भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, आरोपी कुक, 55 वर्षीय लालूराम गुर्जर याला अटक करण्यात आली आहे. तपासात प्रथमदर्शनी आरोप खरा असल्याचे सांगितले. आरोपी अनेक वर्षांपासून काम करत होता. तो फक्त त्याच्या निवडलेल्या मुलांनकडूनच जेवण वाढून घेत होता. मात्र शुक्रवारी त्याने या दोन मुलींना डाळ वाढण्यावरून आक्षेप घेतला. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर जेवायला आलेल्या मुलांना डाळ वाढल्याचे विद्यार्थिनींनी अहवालात म्हटले आहे. अनुसुचीत जातीच्या मुलींनी डाळ वाढली म्हणून कूक लालूराम गुर्जरला राग आला. पहिले स्वयंपाक्याने मुलींना शिवीगाळ केली. या खालच्या जातीच्या आहेत, त्यांनी हात लावलेले अन्न का खावे, फेकून द्यावे, असे म्हटले असल्याचे असेही लोकांना सांगितले. लालूरामच्या आदेशानंतर मुलांनी अन्न फेकून दिले. या प्रकरणाची माहिती मिळताच मेघवाल बस्ती येथील लोकांनी शाळा गाठली. स्वयंपाकीबाबत शिक्षकांकडे तक्रार केली. शिक्षकांनी स्वयंपाक्याचे वागणे चुकीचे असल्याचे म्हटले आणि शाळेत असा भेदभाव करू देणार नाही असे आश्वासन दिले.

या संपूर्ण प्रकरणाबाबत शाळेचे मुख्याध्यापक आणि मध्यान्ह भोजन प्रभारी शिवलाल शर्मा सांगतात की, पिठात बेडूक पडल्याने हे अन्न फेकले गेले. शाळेत सौहार्दपूर्ण वातावरण आहे. सर्व मुले एकाच ठिकाणाहून पाणी पितात. अधिक समज देऊन शाळेचे वातावरण खराब होऊ देणार नाही असे आश्वासन मुख्याध्यापकांनी गावकऱ्यांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT