nikol tina.jpg
nikol tina.jpg 
देश

मृत कोविड 19 रुग्णांवर अंत्यसंस्कार करत आहेत 'त्या' दोघी विद्यार्थिनी 

दैनिक गोमंतक

बंगळूर : देशभरात कोविड 19 (Covid 19)  मुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णामध्ये दररोज होणारी वाढ आणि वाढणारी मृत्यूसंख्या यांमुळे देशभरातील आरोग्यव्यवस्था  कोलमडून गेली आहे.  अशा संकटाच्या काळात देशभरात डॉक्टर्स(Doctors), पोलिस (Police), स्वच्छता कर्मचारी (Cleaning staff)  आघाडीवर काम करत आहेत. तर दुसरीकडे कोविड 19 मुळे मरण पावणाऱ्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत रांगा लागल्या असून या ठिकाणी देखील काही लोक आघाडीवर काम करत आहेत. दररोज कित्येक रुग्णांवर ते अंत्यसंस्कार करत आहेत. भारतात शक्यतो स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी पुरुष काम करत असतात. मात्र बंगळूरात दफनभूमीत कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन विद्यार्थिनी  पुढे आल्या आहेत.  (The two students are burying the dead patients of Covid 19) 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांना घाबरतात का ?"
 
बंगळूरमधील निकोल फुर्तादो (Nicole Furtado)  आणि टीना चेरियन (Tina Cherian)  अशी या विद्यार्थिनींची नावे आहेत. या दोन्ही चुलत  बहिणी आहेत.  कोविड संक्रमित रुग्णांचे दहन करण्याऱ्या स्वयंसेवकांच्या गटामध्ये या दोघी सामील झाल्या आहेत.   कोविड संक्रमित मृत रुग्णाचा  मृतदेह नेण्यासाठी या दोघी स्वत: वाहतुकीची व्यवस्था करतात, असे निकोलच्या एका नातेवाईकाने सांगितले.  निकोल (वय 20) सेंट जोसेफ कॉलेजमधून पदवीधर आहे. तर टीना 21 वर्षांची असून ती मनिपालच्या कस्तूरबा मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. आमचे कुटुंब या साथीच्या आजारात लोकांना मदत करत आहे. यामुळे मी आणि टीना दोघीही कोविड मृतदेह दफन करण्यास प्रेरित झाल्याचे निकोलने म्हटले आहे. आम्हाला इतरांना मदत करायला आवडते. तथापि, या कामात धोका आहे. परंतु धोक्याची भीती बाळगून काहीही न करणे देखील भ्याडपणाचे असल्याचे निकोल म्हणते. 

दरम्यान, निकोल आणि टिना पीपीई किट परिधान करून मृतदेह दफन करण्याचे काम करतात.  हे करत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. आम्ही नेहमी नेहमी काळजी घेत असतो. पूर्णवेळ मुखवटे, गल्व्ह्ज आणि गॉगल परिधान केलेले असतात.  त्याचबरोबर, कोविड 19 चा संसर्ग होऊ नये यासाठी आणि इतरांना जास्तीतजास्त मदत करण्यासाठी आम्ही स्वतःची रोगप्रतिकार शक्ती बळकट ठेवण्यासाठीही आम्ही प्रयत्न करत असल्याचे निकोल ने सांगितले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

SCROLL FOR NEXT