Supreme Court Dainik Gomantak
देश

Gay Couples Moves in Supreme Court: समलैंगिक विवाहाला मान्यता देण्याची दोन 'गे कपल्स'ची मागणी

4 आठवड्यात भुमिका मांडण्याची सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

Akshay Nirmale

Gay Couples Moves in Supreme Court:समलैंगिक विवाहाला स्पेशल मॅरेज अॅक्ट 1954 नुसार कायदेशीर मान्यतेसाठी एका समलैंगिक दाम्पत्याने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. शुक्रवारी या याचिकेवर सरन्यायाधीश चंद्रचूड आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी केंद सरकारचे अॅटर्नी जनरल यांना नोटीस पाठवून सरकारची भूमिका 4 आठवड्यात मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणी सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल झाल्या आहेत. पहिली जनहित याचिका सुप्रियो चक्रवर्ती आणि अभय डांग यांनी दाखल केली आहे. हे गेल कपल असून ते दोघेही जवळपास 10 वर्षांपासून एकत्र राहत आहेत. कोरोनाकाळात या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. दुसऱ्या हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. जेव्हा ते कोरोनातून बरे झाले त्यांनी कुटूंबियांसह स्वतःच्या रिलेशनशिपचा आनंद साजरा करण्यासाठी लग्नाचा निर्णय घेतला. दरम्यान, त्यांच्या लग्नाची नोंद स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार व्हावी, असे दोघांनाही वाटते. त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

दूसरी जनहित याचिका पार्थ फिरोज मेहरोत्रा आणि उदय राज आनंद यांनी दाखल केली आङे. हे दोघेही 17 वर्षांपासून एकत्र राहत आहेत. दोन मुलांचा सांभाळ ते करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यांच्या लग्नाला कायदेशीररित्या पुर्ण समजली जात नाही. त्यामुळेच त्यांना लग्नाला कायदेशीर मान्यता हवी आहे. जेणेकरून मुलांशीही त्यांचे कायदेशीर संबंध निर्माण होतील.

दरम्यान, स्पेशल मॅरेज अॅक्ट आणि फॉरेन मॅरेज अॅक्ट आणि हिंदू मॅरेज अक्टनुसार समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यासाठी दिल्ली हायकोर्टात आणि केरळ हायकोर्टात 9 याचिका दाखल केले आहेत. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खंडपीठासमोर केरळ हायकोर्टातील केंद्राने नोंदवलेल्या मताबाबत सांगितले आहे. त्यामुळे ही सर्व प्रकरणे सुप्रीम कोर्टात हस्तांतरीत केली जाऊ शकतात.

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे की, हा मुद्दा समलैंगिक जोडप्याच्या ग्रॅच्युईटी, दत्तक प्रकरण, सरोगसी अशा मुलभूत अधिकारांबाबत आहे. त्यांना जॉईंट अकाऊंट ओपन करण्यातही अडचणी येतात. स्पेशल मॅरेज अॅक्टमधील सेक्शन चार नुसार कुणीही दोन व्यक्ती लग्न करू शकतात. पण यातील सबसेक्शन (C) मधील अटी केवळ पुरूष आणि महिलांसाठी आहेत. त्यामुळे या कायद्याचे रूपांतर लिंगभावरहित कायद्यात करावे, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT