Tribal community boycotts 24 people in Kerala for eating beef  Dainik Gomantak
देश

केरळमध्ये गोमांस खाल्ल्यामुळे आदिवासी समुदायाने 24 जणांवर टाकला बहिष्कार

याप्रकरणी कोणीही पोलिसात तक्रार दाखल केली नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

दैनिक गोमन्तक

केरळच्या (Kerala) इडुक्की (Idukki) जिल्ह्यात, गोमांस (Beef) खाल्ल्याबद्दल आदिवासी समुदायातील 24 पुरुषांवर ओरुकुटम (आदिवासी परिषद) ने सामाजिक बहिष्कार टाकला आहे. या समाजात गोमांस खाण्यास मनाई आहे. या डोंगराळ जिल्ह्यातील मरूर जंगल परिसरात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था आणि आदिवासी विभागाचे अधिकारी आदिवासी समाजाच्या प्रमुखांशी चर्चा करून हे प्रकरण सोडवण्यात गुंतले आहेत. याप्रकरणी कोणीही पोलिसात तक्रार दाखल केली नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या सर्व 24 लोकांनी जंगलातील झोपडीतून बाहेर आल्यानंतर गोमांस खाल्ले होते. ही बाब उरुकुट्टम यांना कळताच त्यांच्या प्रमुखांच्या बैठकीत या सर्वांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्वांना समाजाच्या जुन्या परंपरा आणि प्रथेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.

ख्रिश्चन मिशनरींच्या आश्रमात गोमांस खाऊ घालून मुलांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सागर जिल्ह्यातील एका ख्रिश्चन मिशनरीच्या सेवाधाम बाल आश्रमावर लहान मुलांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकून त्यांना गोमांस खाऊ घालण्याचा आरोप आहे. विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून राष्ट्रीय बाल आयोगाने पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावली असून 48 तासांत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरण ५ डिसेंबरचे आहे. सागर कैंट पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या बररू येथील आश्रमात राहणाऱ्या मुलांना गोमांस खाऊ घातल्याचा आरोप आहे. त्यांच्या तक्रारीवरून पालक सामाजिक कार्यकर्ते ओंकार सिंग यांच्यासह कैंट पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी पोहोचले होते, मात्र गुन्हा दाखल झाला नव्हता.

या प्रकरणी मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा म्हणाले, 'सागरच्या बाल सेवाधाम आश्रमात लहान मुलांना गोमांस खायला देणे आणि त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे ही बाब निदर्शनास आली आहे. पोलीस अधीक्षक तरण नायक यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT