Surya Anand Bowling Dainik Gomantak
देश

TNPL 2025: अविश्वसनीय! सामना गेला होता हातून... पण 5 चेंडूत 4 विकेट्स घेत केलं 'कमबॅक', पाहा VIDEO

Surya Anand Bowling: तामिळनाडू प्रीमियर लीग २०२५ च्या १६ व्या सामन्यात मदुराई पँथर्सचा गोलंदाज सूर्या आनंदची शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली. सूर्या आनंदने ५ चेंडूत ४ विकेट घेत सामना उलटला. ज्यामुळे मदुराई पँथर्सने १० धावांनी सामना जिंकला.

Sameer Amunekar

TNPL Viral Video :तामिळनाडू प्रीमियर लीग २०२५ चा १६ वा सामना मदुराई पँथर्स आणि नेल्लई रॉयल किंग्ज यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात मदुराई पँथर्सने १० धावांनी विजय मिळवला. मदुराई पँथर्सच्या विजयात सर्वात मोठी भूमिका संघाचा वेगवान गोलंदाज सूर्या आनंदने बजावली. त्याच्या धोकादायक गोलंदाजीच्या बळावर, सूर्या आनंदने शेवटच्या षटकात मदुराई पँथर्सला हरवलेला सामना जिंकून दिला.

या सामन्यात, मदुराई पँथर्सकडून सूर्या आनंदने १९ वा आणि डावातील त्याचा शेवटचा षटक टाकला. नेल्लई रॉयल किंग्जच्या संघाकडे १५८ धावांत ६ विकेट होत्या, त्यानंतर नेल्लई रॉयल किंग्जचा संघ पुढील ५ चेंडूंत १५८ धावांत सर्वबाद झाला.

सूर्या आनंदने १९ व्या षटकात ५ चेंडू टाकले, त्यापैकी चार चेंडूंत त्याने विकेट घेतल्या. त्यामुळे मदुराई पँथर्सचा संघ फक्त १८.५ षटकांत विजयी झाला. एकेकाळी या सामन्यात नेल्लई रॉयल किंग्जचा विजय निश्चित मानला जात होता.

परंतु सूर्या आनंदच्या फक्त ५ चेंडूंनी संपूर्ण सामना उलटला. सूर्याने ३.५ षटके टाकली आणि २४ धावा देऊन ४ बळी घेतले. नेल्लई रॉयल किंग्जकडून फलंदाजी करताना अरुण कार्तिकने सर्वाधिक ६७ धावा केल्या.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मदुराई पँथर्सने २० षटकांत ९ बळी गमावून १६८ धावा केल्या. मदुराई पँथर्सकडून फलंदाजी करताना अनिरुद्धने ३७ चेंडूंत सर्वाधिक ४८ धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले. याशिवाय आथिक उर रहमानने २७ चेंडूंत ३६ धावा केल्या. ज्यामध्ये २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

शेवटी, गुर्जपनीत सिंगने ८ चेंडूत २४ धावा केल्या आणि संघाचा स्कोअर १६८ पर्यंत नेला. नेल्लई रॉयल किंग्जकडून गोलंदाजी करताना रॉकी भास्करने ४ षटकांत २४ धावा देत २ बळी घेतले. याशिवाय सोनू यादवने ४ षटकांत ४१ धावा देत ३ बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Boat In Raigad: रायगडच्या समुद्रात 'पाकिस्तानी बोट'? काही लोक बोटीतून उतरल्याचा संशय, पोलिसांची धावपळ

Goa Politics: ...अन्यथा 2027 च्या निवडणुकीत गंभीर परिणाम भोगावे लागतील, गोमंतक गौड मराठा समाजाचा सरकारला इशारा

Goa Dairy: गोवा डेअरीतील दूध आधारभूत रक्कम 30 जुलैपर्यंत; शिरोडकरांचे आश्वासन

Akash Deep: वडील-भाऊ कोरोनात गेले, बहिण कॅन्सरशी लढतेय; दुःखाचं ओझं बाजूला ठेवत एजबॅस्टनवर आकाश दीपचा 'दीप' तेवला

Goa Opinion: शेकडो कोटी खर्च केले, पण समस्या कायम! गोव्यात विकास होतोय की विकासाचा अतिरेक?

SCROLL FOR NEXT