Mamata Banerjee

 

Dainik Gomantak 

देश

कोलकाता महानगरपालिका निवडणुकीत TMC चा दणदणीत विजय

कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीत टीएमसीने 144 पैकी 134 जागा जिंकून मोठा विजय मिळवला.

दैनिक गोमन्तक

तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी विरोधकांना चांगले सुनावले. त्या म्हणाल्या, भाजप आणि सीपीआय-एमच्या नेत्यांना “अधिक बोलण्याची आणि कमी काम करण्याची” सवय आहे.

कोलकाता महानगरपालिकेच्या (KMC) नवनिर्वाचित नगरसेवकांना संबोधित करताना, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी 19 डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पाडल्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाचे तसेच पोलिस विभागाचे कौतुक केले. बॅनर्जी म्हणाल्या की, "केएमसीचे रिपोर्ट कार्ड तयार केले जाईल आणि दर सहा महिन्यांनी त्याचे मूल्यांकन केले जाईल. जर एखाद्या नगरसेवकाने समाधानकारक काम केले नसेल तर राज्य सरकार त्याच्यावर कारवाई करेल. कोलकातामधील सर्व राजकीय होर्डिंग्ज काढून टाकले जातील व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पावलं उचलली जातील."

पश्चिम बंगालचे (West Bengal) परिवहन आणि गृहनिर्माण मंत्री फिरहाद हकीम यांची आणखी एका टर्मसाठी कोलकाताच्या (Kolkata) महापौरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टीएमसीच्या बैठकीत हकीम यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली. कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीत टीएमसीने (TMC) 144 पैकी 134 जागा जिंकून मोठा विजय मिळवला. भाजपला 3 वॉर्ड जिंकता आले, तर काँग्रेस आणि डाव्यांनी प्रत्येकी 2 जागा जिंकल्या. यापूर्वी पाच वॉर्ड ताब्यात असलेल्या भाजपचा दोन प्रभागांत पराभव झाला. टीएमसीला 92.36 टक्के मते मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT