Viral Video Dainik Gomantak
देश

वाघाची स्टायलिश एन्ट्री! पिंजऱ्यातून बाहेर येताच नदीत उडी, सुंदरबनचा Video पाहून थक्क व्हाल

Tiger Release Video: ब्रह्मपुत्रा नदीत एका वाघाला पिंजऱ्यातून सोडून दिल्याच्या घटनेचा एक रोमांचक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

Tiger Release Video: पश्चिम बंगालमधील सुंदरबनच्या घनदाट खारफुटीच्या जंगलातून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीत एका वाघाला पिंजऱ्यातून सोडून दिल्याच्या घटनेचा एक रोमांचक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक केवळ रोमांचितच होत नाहीत, तर स्वातंत्र्याचा खरा अर्थही समजावून घेत आहेत. स्वातंत्र्य ही अशी भावना आहे, जी प्रत्येक प्राण्याच्या मनात वसलेली असते.

आधी हा व्हिडिओ पाहा!

बंद पिंजऱ्यातून वाघाची सुटका

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका वाघाला बोटीवरुन बंद पिंजऱ्यातून मुक्त केले जात असल्याचे दिसत आहे. या क्षणी वाघ (Tiger) इतका आनंदित होतो की, पिंजऱ्यातून बाहेर पडताच तो क्षणात नदीत उडी मारतो आणि वेगाने पोहत जंगलाच्या दिशेने निघून जातो. वाघाच्या स्वातंत्र्याचा हा थरारक क्षण बोटीवरील लोकांनी आपल्या कॅमेऱ्यांमध्ये कैद केला आहे, जो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वाघ पाण्याला वेगाने कापत जंगलाच्या दिशेने असा धावतो, जणू काही त्याला आपले हरवलेले जग पुन्हा एकदा गवसल्याचा आनंद झाला आहे. या दृश्याने सोशल मीडिया वापरकर्त्यांची मने जिंकली आहेत.

निवृत्त आयएफएस अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ

हा व्हायरल व्हिडिओ निवृत्त भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट @susantananda3 वर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत नंदा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "सुंदरबनमध्ये बचावल्यानंतर सोडलेला वाघ. येथील वाघांनी खारफुटीच्या परिसंस्थेनुसार स्वतःला जुळवून घेतले आहे. आमचे बचाव तंत्रज्ञानही त्याचनुसार विकसित झाले आहे. हा केवळ एक बचाव नाही, तर 'ग्रीन सोल्जर्स' (वन कर्मचाऱ्यांच्या) च्या कठोर परिश्रमाची आणि समर्पणाची ही एक कहाणी आहे." या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून, पसंत केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Makharotsav in Goa: 16व्या शतकातील परंपरा, पोर्तुगीज आक्रमणातून वाचलेल्या मूर्तींचा अनोखा उत्सव; देवीच नाही तर भैरवाचाही भरतो 'मखरोत्सव'

Elephant in Goa: न्हयेंन बुट्टा, शेतांन लोळ्टा! 'ओंकार' अजूनय तांबोशाच; Watch Video

Navratri Special: कामालाच आनंद मानणारी, आव्हानांना सामोरे जाण्याची ऊर्जा देणारी 'महिला उद्योजिका'; दुर्गेचे आधुनिक रुप

Seva Pakhwada: राज्याच्या, देशाच्या प्रगतीचे चित्र उमटललेल्या कलाकृती; 21 व्या शतकातील भारत आणि गोवा प्रदर्शन

Siolim: शिवोलीवासीयांसाठी आनंदाची बातमी! पाणीप्रश्न कायमचा सुटणार; आसगाव, हणजूण, वागातोर, बादे, शापोरा परिसरालाही फायदा

SCROLL FOR NEXT