Indian Army Dainik Gomantak
देश

सुरक्षा दलांनी घेतला राहुल भटच्या हत्येचा बदला, Budgam मध्ये तीन दहशतवादी ठार

Jammu And Kashmir: लतीफच्या हत्येसह, सुरक्षा दलांनी राहुल भट्ट आणि अमरीन भट्ट यांच्यासह अनेक नागरिकांच्या हत्येचा बदला घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात बुधवारी लतीफ रादरसह लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. लतीफच्या हत्येसह, सुरक्षा दलांनी राहुल भट्ट आणि अमरीन भट्ट यांच्यासह अनेक नागरिकांच्या हत्येचा बदला घेतला आहे. या वर्षी मे महिन्यात दहशतवाद्यांनी बडगाममध्ये महसूल विभागाचे कर्मचारी काश्मिरी पंडित राहुल भट यांची हत्या केली होती.

दरम्यान, काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार म्हणाले, 'लष्कर-ए-तैयबाचे (Lashkar-E-Taiba) तीन दहशतवादी मारले गेले आहेत. घटनास्थळावरुन मृतदेह काढण्याचे काम सुरु आहे. चकमकीच्या ठिकाणाहून आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. हे आमच्यासाठी मोठे यश आहे.'

दुसरीकडे, राहुल भटच्या (Rahul Bhat) हत्येनंतर काश्मिरी पंडित रस्त्यावर उतरले होते. काश्मिरी पंडित राहुल भट यांच्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेले दोन दहशतवादी नंतर चकमकीत ठार झाले. याशिवाय, अमरीन भट यांची दहशतवाद्यांनी (Terrorists) बडगामच्या चदूरा भागात 26 मीटरवर हत्या केली होती.

तसेच, रविवारी, प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा ( LET) च्या 'हायब्रीड' दहशतवाद्याला भारतीय लष्कराच्या (Indian Army) 34 आरआर युनिटने बडगाम परिसरातून अटक केली. एएनआयने एका वृत्तात म्हटले आहे की, 'अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून 5 पिस्तूल, 5 मॅगझिन, 50 राऊंड आणि दोन ग्रेनेडसह अपराधी साहित्य जप्त केले आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT