Students of IIT Guwahati Dainik Gomantak
देश

आयआयटी गुवाहाटीचा तौसिफ अखेर गजाआड; ISIS मध्ये सामील होण्याचं केलं होतं तगड प्लॅनिंग

Students of IIT Guwahati: आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्याने ISIS या दहशतवादी संघटनेत सामील होण्याचं तगडं प्लॅनिंग केलं होतं.

Manish Jadhav

Students of IIT Guwahati: आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्याने ISIS या दहशतवादी संघटनेत सामील होण्याचं तगडं प्लॅनिंग केलं होतं. मात्र, फायनल परीक्षेच्या एक महिना आधी त्याला अटक होणे, हे सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे आहे. तौसिफ अली फारुकी असे विद्यार्थ्याचे नाव आहे. फायनल परीक्षा महिनाभरानंतर होणार होती आणि त्यानंतर तो बीटेक पदवीधर होऊन चांगले भविष्य घडवू शकला असता. दरम्यान, त्याने खोरासानमध्ये जाऊन इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्याची योजना आखली. एका हुशार विद्यार्थ्याची विचारसरणी अशी कशी बनली की तो त्याच्या भविष्याचा विचारही करु शकत नाही, हे समजण्याचा पोलीस आणि आयआयटी प्रशासन दोघेही प्रयत्न करत आहेत. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, फारुकीचे कुटुंब अगदी सामान्य आहे. फारुकीच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. फारुकीचा मोठा भाऊ देखील आयआयटी कानपूरमधून पदवीधर आहे. तो स्वतःचा स्टार्टअप चालवतो. तो दिल्लीच्या झाकीर नगरचा रहिवासी आहे.

दरम्यान, फारुकीच्या मित्रांनी सांगितले की, तो अभ्यासात खूप मेधावी होता आणि तो बहुधा एकटाच राहत असे. फारुकीला जाणणारे लोक सांगतात की, त्याचे शिक्षण चांगल्या वातावरणात झाले होते. त्याला कट्टरतावादी बनवण्यात डार्क वेबची भूमिका असू शकते. वास्तविक, आयआयटी गुवाहाटीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात स्वतंत्र रुम मिळतात, अशा परिस्थितीत गेल्या दोन वर्षांपासून तो एकटाच राहत होता. या घटनेने आयआयटीचे प्राध्यापकही आश्चर्यचकित झाले.

फारुकीच्या काकूंनी सांगितले की, संपूर्ण कुटुंबाला दोन्ही भावांचा अभिमान होता. दोघीही अभ्यासात अतिशय निपुण होते. आयआयटीमध्ये निवड झाल्यावर फारुकीच्या कुटुंबीयांनी मिठाई वाटली होती. सध्या फारुकीची आई बाटला हाऊसमध्ये बुटीक चालवते. त्याचे वडील पाटणा येथे राहतात. पोलिसांचे म्हणणे आहे की, फारुकी एकटाच राहत होता आणि केवळ क्लासला जाण्यासाठीच रुममधून बाहेर पडत असे. गेल्या काही महिन्यांतच त्याचे माइंडवॉशिंग झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यामागे डार्कवेब असल्याची त्यांना शंका आहे.

दुसरीकडे, फारुकीच्या रुममध्ये काळा झेंडाही सापडला. हा झेंडा कोणत्या संघटनेचा होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याने लिहिलेल्या मेलमध्ये विद्यार्थी आणि आयजीपी पार्थ सारथी महंता यांना का जोडले हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्याने आपल्या मेलमध्ये हिजरत म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणे याविषयी लिहिले होते. यानंतर तो कॅम्पसमधून गायब झाला. अनेक तासांच्या तपासानंतर त्याला 20 किलोमीटर अंतरावरील हज येथून अटक करण्यात आली. त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT