Petrol-Diesel Dainik Gomantak
देश

GST परिषदेत पेट्रोल-डिझेलबाबत चर्चा नाही; मोदी सरकारची लोकसभेत माहिती

जीएसटी परिषदेत पेट्रोल-डिझेलचा (Petrol-Diesel) जीएसटीमध्ये समावेश करण्याबाबतच्या सूचना अद्याप राज्यांकडून आलेल्या नाहीत.

दैनिक गोमन्तक

देशात कोरोनाचं (Covid 19) सावट अजूनपर्यंत कमी झालेलं नाही. त्यातच आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पेट्रोल-डिझेलचा जीएसटीमध्ये (GST) समावेश करण्याबाबत जीएसटीच्या परिषदेमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, अशी माहिती मोदी सरकारने लोकसभेत दिली आहे. जीएसटी परिषदेत पेट्रोल-डिझेलचा (Petrol-Diesel) जीएसटीमध्ये समावेश करण्याबाबतच्या सूचना अद्याप राज्यांकडून आलेल्या नाहीत. त्यामुळे यावर चर्चा झालेली नाही, असं अर्थ राज्यमंत्री पंकज चैौधरी (Minister of State for Economics Pankaj Choudhary) यांनी सांगितलं.

पेट्रोल- डिझेलचा जीएसटीच्या कक्षेमध्ये आणायचं असेल तर त्यासंबंधीचा प्रस्ताव जीएसटी परिषदेनं मांडण गरजेचं आहे. परंतु राज्यांचंही प्रतिनिधित्व असलेल्या जीएसटी परिषदेनं कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव मांडलेला नाही. पाच खासदारांनी सभागृहामध्ये यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना पंकज चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान, अर्थ मंत्रालयाने पेट्रोलिअम पदार्थांच्या किमतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं की, पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजाराशी या जोडलेल्या असतात. वेगवेगळ्या निकषांद्वारे तेल कंपन्या त्यांच्या किरकोळ विक्रीचा दर निश्चित करत असतात. यामध्ये तेलाचा आंतरराष्ट्रीय दर, एक्सचेंज रेट, कर रचनास स्थानिक कर आणि त्यासंबंधीच्या इतर बाबींचा विचार करण्यात येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: योग दिनावरून राजकारण करू नका!

खेळता-खेळता काळाने घातला घाला! मांगोरहिल येथे तीन वर्षीय बालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

वर्षभरानंतर गोमंतकीयांना प्रतिदिनी हजार लीटर पाणी, 325 एमएलडी क्षमतेचे 11 जलशुद्धीकरण प्रकल्‍प

16 FDC Drugs Banned: 16 एफडीसी औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी मोठा निर्णय

मुदतपूर्व निवडणुकीची सज्जता, भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत रणनीतीवर खल; 40 जागा लढवून 30 जिंकण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT