Rape Dainik Gomantak
देश

बलात्काराच्या आरोपीशी तरुणीन केलं लग्न मात्र...

दिल्लीमध्ये (Delhi) बलात्काराचा आरोप असणाऱ्याशी विवाह केल्यानंतर एका 29 वर्षीय तरुणीनं आपला जीव गमावला आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्लीमध्ये (Delhi) बलात्काराचा आरोप असणाऱ्याशी विवाह केल्यानंतर एका 29 वर्षीय तरुणीनं आपला जीव गमावला आहे. लग्नानंतर दीड महिन्यांनी या युवतीचा मृतदेह सापडला. तिच्याच पतीने तिचा गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेह खोल दरीत फेकून दिला असल्याची घटना समोर आली आहे. मृत युवतीवर आरोपीने मागील वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये बलात्कार केला होता. त्यानंतर आरोपी कोठडीत असताना महिलेने त्याच्याशी लग्न करण्यास होकार दिल्यानं त्याची सुटका करण्यात आली होती. आम्ही तिला म्हटलं होतं तू त्याच्याबरोबर उत्तराखंडला जाऊ नकोस, मात्र ती गेली आणि तिचं हे जाणं अखेर ठरलं. दुसरकीडे आरोपीला फासावर लटकविण्यात यावे अशी मागणी तिच्या भावाने केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश हा मूळचा उत्तराखंड राज्यातील आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये त्याने दिल्लीच्या डाबरी भागामध्ये एका तरुणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पिडीत युवतीने आरोपीशी लग्न करण्य़ास होकार दिल्यानंतर त्याला कोठडीमधून सोडण्यात आले होते.

मृत युवतीच्या भावाने म्हटले, आम्ही आरोपीशी लग्न करण्याच्या तिच्या निर्णयाचा विरोधा केला होता. मात्र आरोपीला तिच्याबरोबर विवाह करायचंय असं तिला वाटत होतं. त्यामुळे आम्ही तिला होकार दिला. त्यानंतर 11 जूनला आरोपीने तिला उत्तराखंडला सोबत येण्यास विचारलं होतं. मात्र आम्हाला तिची काळजी वाटत राहिली होती. त्यामुळे या दोघांना सोबत जाऊ द्यावं किंवा नाही याबाबत आमच्या मनात संभ्रम होता त्यासाठी आम्ही पोलिसांना विचारलं ही होतं. ती जेव्हा उत्तराखंडला गेली तेव्हा तीचा फोन बंद करण्यात आला होता. चार दिवस प्रयॉ मात्र कपडे आणि दागिन्यांवरुन तिची ओळख पटविण्यात आली होती.

कुटुंबियांच्या तक्रारीनंतर आम्ही सुमारे 150 दऱ्या खोऱ्यांमध्ये शोध घेण्यात आला होता. असं डाबरी पोलिसांनी सांगितले. पोलिस अधिकारी सुरिंदर संधू यांनी सांगितले, आरोपीने तिला एका निर्जन ठिकाणी बोलावलं नंतर तिला मारुन तिचा मृतदेह खोल दरीमध्ये टाकून दिला. त्यानंतर जवळच असणाऱ्या रुद्रपूर इथे त्याच्या घऱी निघून गेला आणि तरुणीच्या कुटुंबीयांनी तिला सोबत पाठविण्यास नकार दिला असल्याचं आपल्या भावाला सांगितलं, अशी कबुली आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT