The Supreme Court dismissed the Public Interest Litigation against Darwin and Einstein's theories Dainik Gomantak
देश

Darwin's Theory: डार्विन, आइनस्टाईनच्या सिद्धांताविरोधात PIL, सुप्रीम कोर्टाने याचिकार्त्याला हाकलले

Newton's Law: युक्तिवाद सादर करताना याचिकाकर्त्याने दावा केला की, डार्विनचा सिद्धांत स्वीकारल्यामुळे दोन कोटी लोक मरण पावले आहेत.

Ashutosh Masgaunde

The Supreme Court dismissed the Public Interest Litigation against Darwin and Einstein's theories:

सर्वोच्च न्यायालयाने डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताला आणि आइनस्टाईनच्या सापेक्षतेच्या समीकरणांना आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळून लावली.

न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने सांगितले की, जर याचिकाकर्त्याला वैयक्तिकरित्या डार्विन आणि आइनस्टाईनचे वैज्ञानिक सिद्धांत चुकीचे वाटत असतील तर सर्वोच्च न्यायालयाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

न्यायमूर्ती कौल यांनी न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर झालेल्या याचिकाकर्ते राज कुमार यांना सांगितले की, तुमचा विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या विश्वासाचा प्रचार करू शकता.

कायदेशीर बाबी स्पष्ट करताना न्यायमूर्ती कौल म्हणाले की, भारतीय राज्यघटनेच्या कलम 32 अन्वये वैज्ञानिक सिद्धांत योग्य की अयोग्य हा प्रश्न रिट याचिकेत उपस्थित केला जाऊ शकत नाही. या अंतर्गत मूलभूत अधिकारांशी संबंधित मुद्दे उपस्थित केले जातात.

वैज्ञानिक तत्त्वांविरुद्ध युक्तिवाद

याचिकाकर्ते राज कुमार यांना हे सिद्ध करायचे होते की, आइन्स्टाईनचा विशेष सापेक्षतेच्या समीकरणाचा सिद्धांत (E = MC2) बरोबर नाही.

मानवी उत्क्रांतीबाबत डार्विनच्या वैज्ञानिक सिद्धांतांचेही त्यांनी खंडन केले. याचिकाकर्त्याने सांगितले की वैज्ञानिक, सिद्धांतांचे खंडन करण्यासाठी त्यांचे स्वतःचे युक्तिवाद आहेत. हे युक्तिवाद मांडण्यासाठी त्यांना एक मंच हवा होता.

दोन कोटी लोकांच्या मृत्यूचा दावा

याचिकाकर्त्याने खंडपीठाला सांगितले की, आपण शाळा-कॉलेजमध्ये जे काही वाचले होते, ते चुकीचे असल्याचे आता लक्षात आले. त्याच्या समर्थनार्थ युक्तिवाद सादर करताना याचिकाकर्त्याने दावा केला की, डार्विनचा सिद्धांत स्वीकारल्यामुळे दोन कोटी लोक मरण पावले आहेत.

डार्विन आणि अल्बर्ट आइनस्टाईन यांचा सिद्धांत काय आहे?

डार्विनचा असा विश्वास होता की, आपल्या सर्वांचे पूर्वज समान आहेत. प्रत्येक प्रजाती, मग ती माणसे असोत, वनस्पती असोत किंवा प्राणी असोत, सर्व एकमेकांशी संबंधित आहेत. यालाच उत्क्रांती सिद्धांत म्हणतात.

अल्बर्ट आइनस्टाईनचा विशेष सापेक्षता सिद्धांत दोन सूत्रांवर आधारित आहे. प्रथम- एकमेकांच्या सापेक्ष सरळ आणि एकसमान गतीने फिरणाऱ्या सर्व प्रयोगशाळांमध्ये, शरीराची गती भौतिकशास्त्राच्या समान नियमांचे पालन करते. याला गतीची सापेक्षता असेही म्हणतात.

दुसरा- प्रकाशाचा वेग नेहमीच स्थिर राहतो आणि स्त्रोताच्या किंवा निरीक्षकाच्या हालचालीचा त्यावर काहीही परिणाम होत नाही.

सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला हाकलले

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने या याचिकेवर नाराजी व्यक्त केली आणि त्यावर सुनावणी करण्यास नकार दिला.

आम्ही इथे न्यूटन किंवा आईन्स्टाईन यांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी बसलेले नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

याचिकाकर्त्याने स्वतःचा सिद्धांत मांडला तर बरे होईल. तुम्ही म्हणता की, तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आहात आणि तुम्ही हा सिद्धांतही वाचला आहात. तुमचा युक्तिवाद असा आहे की, चुकीची शिकवण दिली गेली. असे वाटत असेल तर सर्वोच्च न्यायालय यात काहीही करू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT