Court  Dainik Gomantak
देश

एकत्र राहणाऱ्या स्त्री-पुरुषाचे नाते लग्नासारखेच - सर्वोच्च न्यायालय

त्या मुलांना ही वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळणार

दैनिक गोमन्तक

भारतीय संस्कृतीनुसार विवाहपूर्व आणि विवाहानंतर स्त्री आणि पुरुष यांच्या जगण्याच्या पद्धती ह्या परंपरागतरित्या वेग - वेगळ्या आहेत. मात्र पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने यात बदल होत गेले. आणि स्त्री-पुरुष एकत्र राहणार हे व्यक्तीगतरित्या ठरले जाऊ लागले आहे. याला सर्वाच्च न्यायालयाने ही पुष्टी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय देताना म्हटले आहे की, जर स्त्री आणि पुरुष दीर्घकाळ एकत्र राहत असतील तर ते लग्न मानले जाईल, आणि या नात्यातून जन्माला आलेल्या मुलांनाही वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळेल. (The relationship between a man and a woman living together is like marriage )

हा निर्णय एका खटल्याचा निकाल देताना हा निर्णय रद्द केला होता. ज्यात न्यायालयाने तरुणाला त्याच्या वडिलांच्या मालमत्तेत वाटेकरी मानले नाही. कारण त्याच्या पालकांनी लग्न केले नव्हते. दोघांचे लग्न झाले नसले तरी दोघेही दीर्घकाळ पती-पत्नीसारखे एकत्र राहत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत मूल दोघांचे असल्याचे डीएनए चाचणीत सिद्ध झाल्यास वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा पूर्ण हक्क आहे.

केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला

केरळमधील एका व्यक्तीने वडिलांच्या मालमत्तेतील वाटा न मिळाल्याने उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. तो म्हणाला होता - त्याला अनैतिक मुलगा सांगून वाटा दिला जात नाही. केरळ हायकोर्टाने निकाल देताना म्हटले होते की, ज्या व्यक्तीच्या मालमत्तेवर तो दावा करत आहे, त्याच्या आईने त्याच्याशी लग्न केलेले नाही, अशा परिस्थितीत त्याला कौटुंबिक मालमत्तेचा हक्क समजता येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT