Agni 5 Dainik Gomantak
देश

ड्रॅगनच्या मिसाईल समोर भारताचं अग्नी 5 किती पॉवरफुल, जाणून घ्या

या क्षेपणास्त्राचा (Agni 5) पल्ला 5 हजार किमी आहे.

दैनिक गोमन्तक

भारत (India) अनेक क्षेत्रांमध्ये गगनभरारी घेत असतानाच संरक्षण क्षेत्रातही उत्तम कामगिरी केली आहे. या क्षेत्रामध्ये आपल्या संशोधकांनी अतुलनीय अशी कामगिरी केली आहे. तसेच आजही यशस्वीरित्या आपले कौशल्यपणाला लावत देशाला एका उंचीवर घेऊन जात आहेत. 27 ऑक्टोबर 2021 रोजी, भारताने संरक्षण क्षेत्रात एक मोठे यश संपादन केले. अणुशक्तीवर चालणाऱ्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-5 (Agni-5) ची ओडिशाच्या (Odisha) डॉ. एपीजे अब्दुल कलाम केंद्रावरुन (APJ Abdul Kalam Center) यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राचा पल्ला 5 हजार किमी आहे. अर्थात संपूर्ण आशिया खंड आणि युरोप-आफ्रिकेचा काही भागही त्याच्या रडारवर येतो. यावेळी जेव्हा सर्व देश आपली शक्ती वाढवत असताना भारतही नव नव्या संशोधनाच्या माध्यमातून शेजारी असणाऱ्या चीन (China) आणि पाकिस्तान (Pakistan) यासारख्या देशांना शह देण्यासाठी योजना तयार करत होता. त्याच वेळी भारताला अग्नी-5 सारख्या क्षेपणास्त्र प्रणालीची खूप गरज होती.

चीनची संरक्षण यंत्रणा अतिशय मजबूत आहे यात शंका नाही. परंतु ज्या वेगाने भारतीय संरक्षण यंत्रणा प्रगती करत आहे, तो दिवस दूर नाही जेव्हा आपण चीनला मागे टाकू. अग्नी-5 च्या यशस्वी चाचणीसोबतच भारत रशियाकडून (Russia) एस-400 क्षेपणास्त्रांच्या 5 रेजिमेंट खरेदी करण्यास तयार आहे. एकूणच, भारत आता आपल्या संरक्षण क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. तसेच आपल्या सामर्थ्याने संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवत आहे.

चीन तक्रारी करत आहे

दरम्यान, जगातील सर्वात मोठे सैन्य चीनकडे आहे. परंतु असे असताना भारताने अग्नी 5 क्षेपणास्त्राची चाचणी केली तेव्हा चीनला मोठा धक्का बसला. असे करुनही भारताला आशिया खंडातील शांततामय वातावरणाला कोणताही धोका पोहोचवायचा नाही. मात्र दुसरीकडे चीने आशियातील शांततायमय वातावरण भारताला बिघडवायचे असल्याचे आरोप केले आहेत. चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही आपली यासंबंधीची तक्रार केली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले, "भारताची चाचणी जून 1998 मध्ये मंजूर झालेल्या निःशस्त्रीकरणाच्या ठरावाचे उल्लंघन आहे." भारताने अशाच प्रकारे आपल्या अग्नी क्षेपणास्त्राची श्रेणी वाढवण्याचे थांबवले नाही तर शेजारी राष्ट्रांमधील शस्त्रास्त्रांची शर्यत आणखी तीव्र होऊन या प्रदेशात शांतता राखणे कठीण होईल.- हे स्पष्टपणे दिसून येत आहे. वास्तविक चीनमधील जवळपास सर्व शहरे अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या रडारवर येतात. त्यामुळे भारताच्या वाढत्या सामर्थ्याची धास्ती घेतली आहे.

मात्र, भारताच्या अग्नी-5 क्षेपणास्त्र चाचणीबाबत चीनची तक्रार आहे, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. याच चीनने ऑगस्टमध्ये 'लाँग मार्च' या हायपरसॉनिक ग्लायड क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. ब्रिटीश वृत्तपत्र फायनान्शिअल टाईम्सने एका लेखात सांगितले होते की, हे चीनी क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. चीनच्या या नव्या चाचणीमुळे अमेरिकाही घाबरली आहे. कारण आतापर्यंत जगातील कोणत्याही देशाने अशा प्रकारच्या शस्त्राचा प्रोटोटाइप तयार केला नव्हता.

चीनच्या क्षेपणास्त्रात काय खास आहे?

अलीकडेच चीनने एका क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती, ज्यामध्ये हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. हे क्षेपणास्त्र आण्विक वारहेड सोडण्यास सक्षम आहे. पृथ्वीवरील वायु प्रणाली टाळण्यात देखील यशस्वी होऊ शकते. भीतीची बाब अशी आहे की, हे थांबवणे थोडे कठीण आहे. अहवालानुसार, अमेरिकेकडे अशी शक्ती नाही. वास्तविक, हे क्षेपणास्त्र शोधण्यायोग्य नसल्याने ते अधिक धोकादायक मानले जात आहे. तथापि, फायनान्शिअल टाईम्सने गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, हे क्षेपणास्त्र प्रथमच आपल्या लक्ष्यापासून 40 किमी दूर होते. मात्र चीननेही अशाप्रकारचे दावे फेटाळून लावले आहेत.

दोघांमध्ये काय फरक आहे?

दोन्ही क्षेपणास्त्रांचे वेगवेगळे प्रकार आहेत. जिथे भारतीय क्षेपणास्त्र हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे तर चिनी क्षेपणास्त्र हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. ICBM हे एक लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे, जे पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर पडून नंतर परत येते. पॅराबोलासारखे आपल्या लक्ष्याचे साध्य करते. त्याच वेळी, रॉकेटद्वारे हायपरसॉनिक प्रक्षेपित केले जाते, जे कमी पृथ्वीच्या कक्षेत ध्वनीच्या वेगाच्या पाच पट ते 25 पट आहे. हे वाहन आण्विक पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे, ज्यामुळे प्रक्षेपण करणार्‍या देशाला जगभरातील जवळजवळ कोणत्याही लक्ष्यावर हल्ला करता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: कुशावती गाळाने भरली, गोव्यातील कदंब राजकर्त्यांनी चांदोर येथून जुवारी नदीकिनारी राजधानी नेली..

Tejas Fighter Jet Crash: दुबई एअर शोमध्ये 'तेजस' लढाऊ विमान कोसळले; दुर्घटनेत वैमानिकाचा दुर्देवी मृत्यू

AUS vs ENG 1st Test: ॲशेसमध्ये 100 वर्षांतील सर्वात मोठा रेकॉर्ड! स्टार्क-स्टोक्सच्या माऱ्यापुढे फलंदाज ढेपाळले; पहिल्याच दिवशी 19 विकेट्स VIDEO

Bodybuilder Roya Karimi: 14व्या वर्षी लग्न, 15व्या वर्षी आई... 'तालिबानी' बंधनं झुगारुन 'रोया करीमी' बनली टॉपची बॉडीबिल्डर; आज जगभर होतेय चर्चा

AUS vs ENG: पहिल्याच सामन्यात गरमागरमी, लाबुशेन-कार्स मैदानावर भिडले; बाचाबाचीचा व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT