Diabetes patients in India  Dainik Gomantak
देश

Diabetes Patients in India: भारतातील मधुमेह रुग्णांची संख्या 10 कोटींच्या पुढे; 4 वर्षांत 44 टक्के रुग्ण वाढले

भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या 10 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. आयसीएमआरच्या अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या ४ वर्षांत ४४ टक्के लोक या आजाराचे बळी ठरले आहेत.

Ashutosh Masgaunde

 ICMR Diabetes Study : भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा जगात सर्वाधिक झाली आहे. देशातील मधुमेहाच्या रुग्णांची संख्या आता 10 कोटींच्या पुढे गेली आहे. ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येची आकडेवारी यूके मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

हा अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) तयार केला आहे. ICMR च्या अभ्यास अहवालानुसार, भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या १०.१ कोटींपेक्षा जास्त झाली आहे. 2019 मध्ये रुग्णांची संख्या 7 कोटी होती.

गेल्या 4 वर्षांत रुग्णांच्या संख्येत 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही विकसित राज्यांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांची ही संख्या स्थिर होत आहे, तर काही राज्यांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे.

अहवालात दावा करण्यात आला आहे की सुमारे 13.6 लोक प्रीडायबेटिस आहेत. याशिवाय अनेक राज्यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते.

राज्यांबद्दल बोलायचे तर, गोव्यात सर्वाधिक 26.4 टक्के, पुद्दुचेरीमध्ये 26.3 टक्के आणि केरळमध्ये 25.5 टक्के मधुमेहाचे प्रमाण आढळून आले.

त्याचवेळी, पुढील काही वर्षांत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि अरुणाचल प्रदेशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्याही वाढू शकते.

दुसरीकडे, मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशनने सांगितले की, गोवा, केरळ, चंदीगड आणि तामिळनाडूमध्ये प्री-डायबेटिसची प्रकरणे मधुमेहाच्या प्रकरणांपेक्षा कमी आहेत. तर पुद्दुचेरी आणि दिल्लीत हा आकडा बरोबरीचा आहे.

उत्तर प्रदेशमध्ये मधुमेहाची सर्वात कमी प्रकरणे, परंतु धोका जास्त

देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. येथे ४.८ टक्के लोक मधुमेही आहेत. तरी प्री-डायबेटिक रुग्णांची संख्या खूपच धोकादायक आहे.

अहवालानुसार, प्री-डायबिटीज असलेल्या लोकांची संख्या येथे प्रत्येक व्यक्तीमागे सुमारे 5 आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आरोग्याची काळजी न घेतल्यास येत्या काही दिवसांत येथील मधुमेह रुग्णांची संख्या विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे.

मधुमेहामुळे या आजारांचा धोका

मधुमेह हा एक असाध्य रोग आहे. याचे कारण म्हणजे रक्तातील साखरेचे असंतुलन. मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रित करणे हे मोठे आव्हान असते. त्याचबरोबर मधुमेहामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. यामध्ये हृदयापासून ते रक्तदाब, नैराश्य, दृष्टी आणि किडनीशी संबंधित विकारांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT