Weather Update
Weather Update Dainik Gomantak
देश

Weather Update: मॉन्सून केरळ किनारपट्टीवर 5 दिवस आगोदरच होणार दाखल?

दैनिक गोमन्तक

Weather Update: उष्णतेच्या दाहकतेचा सामना करणाऱ्या देशातील बहुतांश भागातील जनतेला दिलासा देणारी बातमी आहे. मॉन्सून 15 मे रोजी केवळ अंदमान आणि निकोबार बेटांवरच पोहोचणार नाही, तर 25 मे रोजी केरळच्या किनारपट्टीवरही पोहोचेल, जे त्याच्या सामान्य वेळेपेक्षा सुमारे पाच दिवस अगोदर असणार आहे. नैऋत्य मॉन्सून हा भारताच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. केरळच्या किनार्‍यावर वेळेच्या पाच दिवस अगोदर पोहोचणे अपेक्षित आहे. साधारणपणे 1 जून रोजी मॉन्सून केरळच्या किनारपट्टीवर पोहोचतो. (The monsoon is expected to reach the Kerala coast five days ahead of time according to the meteorological department)

भारतीय हवामान खात्याने सांगितले की, 'यंदा नैऋत्य मॉन्सून आपल्या नियोजित वेळेपूर्वी केरळमध्ये पोहोचेल. नियोजित वेळेच्या सुमारे 4-5 दिवस आधी तो दाखल होऊ शकतो.'

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, "यंदा नैऋत्य मॉन्सून (Monsoon) केरळमध्ये (Kerala) नियोजित वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता आहे. या वर्षी दक्षिणेकडील केरळ राज्यात मॉन्सून 27 मे पर्यंत पोहोचेल."

पंधरवड्याहून अधिक काळ उष्णतेने त्रस्त असलेल्या देशातील बहुतांश भागातील लोकांना मॉन्सून लवकर आल्याने दिलासा मिळेल. 14 ते 16 मे दरम्यान द्वीपसमूहात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विभागानुसार, 15 आणि 16 मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रावर 40 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

Madgaon Station News: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

आम्ही गप्प बसू शकत नाही...अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास कोर्टाची परवानगी

SCROLL FOR NEXT