The Kerala Story Dainik Gomantak
देश

The Kerala Story चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी, 'ममता बॅनर्जी दहशतवादी संघटनांच्या पाठीशी...'

The Kerala Story Controversy: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावरुन सुरु झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

Manish Jadhav

The Kerala Story Controversy: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावरुन सुरु झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी 'द केरळ स्टोरी' वर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश जारी केले, जेणेकरुन द्वेष आणि हिंसाचाराची घटना टाळता येईल. चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या सिनेमागृहावर कारवाई करण्यात येईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

आदल्या दिवशी, बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, द केरळ स्टोरीमध्ये तथ्यांचा विपर्यास करण्यात आला आहे, ज्याचा केरळला बदनाम करण्याचा हेतू आहे.

ममता यांनी बंदीची घोषणा केली

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 'द्वेष आणि हिंसाचाराची घटना टाळण्यासाठी आणि राज्यात शांतता राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास त्या सिनेमागृहावर कारवाई करण्यात येईल. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन आहेत.

हा चित्रपट केरळमधील (Kerala) महिलांच्या समूहाभोवती फिरतो, ज्यांना धर्मांतर करुन ISIS मध्ये सामील होण्यास भाग पाडले जाते. हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला.

दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील 'द केरळ स्टोरी' वरील बंदीवरुन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.

ठाकूर म्हणाले की, 'काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे लोक सत्तेत असताना वेगळंच बोलायचे आणि आता ते खोटा अपप्रचार करत आहेत. तुष्टीकरणाचे राजरकारण भारतातील मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. राजकीय कारणामुळे विरोधी पक्षातील लोक निषेध करत आहेत.'

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, 'पश्चिम बंगालसारख्या राज्याने चित्रपटावर बंदी घालून मोठा अन्याय केला आहे. तिथे एका निष्पाप मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली, यावर ममता बॅनर्जी काहीच बोलत नाहीत, पण चित्रपटावर बंदी घालत आहेत.

अशा दहशतवादी संघटनेच्या पाठीशी उभे राहून आणि त्यांच्या विचारसरणीचा प्रचार करुन तुम्हाला काय मिळत आहे?'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT