Book
Book Dainik Gomantak
देश

सनराईज ओव्हर अयोध्या; दिल्ली हायकोर्ट म्हणाले, 'तुम्ही वाचू नका, डोळे बंद करा'

दैनिक गोमन्तक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांचे नवे पुस्तक 'सनराईज ओव्हर अयोध्या' सातत्याने वादात सापडले आहे. पण दिल्ली उच्च न्यायालयाने खुर्शीद यांना दिलासा देत पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, जर लोक इतके संवेदनशील वाटत असतील तर आम्ही काय करू शकतो. कोणीही त्यांना ते वाचण्यास सांगितले नाही.

खरे तर या पुस्तकात सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस (ISIS) आणि बोको हराम सारख्या कट्टरवादी संघटनांशी केली आहे. त्यानंतर यावर आक्षेप घेतला जात होता. दरम्यान, दिल्लीचे वकील विनीत जिंदाल (Vineet Jindal) यांनी सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकाच्या (Book) प्रकाशन आणि विक्रीवर बंदी (Prohibition on publication and sale of books) घालण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) याचिका दाखल केली होती.

पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हराम सारख्या दहशतवादी संघटनांशी करण्यात आली असून त्यामुळे देशातील कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचे याचिकेत म्हटले आहे. याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने म्हटले की, जर लोक इतके संवेदनशील वाटत असतील तर आम्ही काय करू शकतो. कोणीही त्यांना ते वाचण्यास सांगितले नाही. तुम्ही डोळे बंद करून वाचू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

पुस्तकावरून झालेल्या वादानंतर नैनितालमधील रामगढ येथील खुर्शीद यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आणि जाळपोळही करण्यात आली. त्यानंतर फेसबुक पोस्टमध्ये खुर्शीद म्हणाले, 'मी अजूनही चूकीचा आहे का? हे हिंदुत्व असू शकते का?'' यासोबतच त्यांनी अनेक व्हिडिओही शेअर केले आहेत, ज्यामध्ये काही लोक भाजपचा झेंडा घेऊन धार्मिक घोषणा देताना दिसत आहेत. यासोबतच त्याने अनेक व्हिडिओही शेअर केले आहेत, ज्यामध्ये काही लोक भाजपचा झेंडा घेऊन धार्मिक घोषणा देताना दिसत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

Madgaon Station News: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

आम्ही गप्प बसू शकत नाही...अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास कोर्टाची परवानगी

SCROLL FOR NEXT