Gyanvapi mosque Case Dainik Gomantak
देश

Gyanvapi Masjid Verdict: ज्ञानवापी प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी

Gyanvapi Case: ज्ञानवापी प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Gyanvapi Case: ज्ञानवापी प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून लावली. वाराणसी न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल दिला आहे. न्यायालयाने अंजुमन इंतेजामिया समितीची याचिका फेटाळून लावली. पाच महिला हिंदू पक्षांच्या बाजूने न्यायालयाने हा निकाल दिला आहे. ज्ञानवापी शृंगार गौरी वाद प्रकरणी निकाल देताना जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांच्या एकल खंडपीठाने हे प्रकरण सुनावणीयोग्य असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, 'न्यायालयाने (Court) मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून लावली. हे प्रकरण सुनावणीयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार आहे.'

कडेकोट सुरक्षा व्यवस्था

या निर्णयानंतर वातावरण बिघडू नये म्हणून शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. वाराणसीचे पोलीस आयुक्त ए. सतीश गणेश यांनी रविवारी सांगितले होते की, 'ज्ञानवापी-श्रृंगार गौरी प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कलम 144 लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या भागातील धार्मिक नेत्यांशी संवाद साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.'

तसेच, संपूर्ण शहरातील सर्व सेक्टरमध्ये आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील भागात फ्लॅग मार्च आणि पायी गस्त घालण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील संवेदनशील भागात अतिरिक्त पोलिस (Police) बंदोबस्त करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सीमेवर तपास आणि दक्षता वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हॉटेल, धर्मशाळा आणि गेस्ट हाऊसमध्ये तपासणी करण्यासोबतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT