जुलै महिन्यात देशात ९४ ते १०६ टक्के इतक्या पावसाची शक्यता Dainik Gomantak
देश

देशात जुलै महिन्यात सरासरी पावसाची शक्यता

जुलै महिन्यात देशात ९४ ते १०६ टक्के इतक्या पावसाची शक्यता आहे. राज्यांसह दक्षिण भारत, पूर्व भारतात काही भागात पावसाचे प्रमाण सरासरी इतके राहणार आहे

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) (Mansoon) चा जुलै (July) महिन्याचा अंदाज समोर आला आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत ९४ चे १०६ टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे. महाराष्ट्रात अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले आहे.

जुलै महिन्यात देशात ९४ ते १०६ टक्के इतक्या पावसाची शक्यता आहे. राज्यांसह दक्षिण भारत, पूर्व भारतात काही भागात पावसाचे प्रमाण सरासरी इतके राहणार आहे. मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाराष्ट्रात यंदा कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी किंवा सरासरी इतका पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तापमानाचा फरक सध्या सर्वसामान्य आहे. मान्सून हंगामातही स्थिती नकारात्मक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बहुतांश भागात पाणी टंचाई पहावयास मिळू शकते.

मॉन्सून राज्यात दाखल झाल्यनंतर कोकण आणि विदर्भ वगळता त्याने राज्यात दडी मारलेली आहे. राज्यात पावसाला जोर धरण्यास अजून काही दिवस तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोकणात काही ठिकाणी तर राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT