Justice Chandrachud Dainik Gomantak
देश

Supreme Court: न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाने मोडले सर्व रेकॉर्ड, जाणून घ्या

Justice Chandrachud: देशाचे भावी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सर्व विक्रम मोडीत काढले.

दैनिक गोमन्तक

Supreme Court: देशाचे भावी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सर्व विक्रम मोडीत काढले. रात्री 9.15 वाजेपर्यंत खंडपीठाने सुमारे 75 प्रकरणांची सुनावणी केली. सामान्य दिवशी, न्यायालयीन कामकाज 4 ते 5 वाजेपर्यंत संपते, मात्र न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठात विजयादशमीच्या सुटीपूर्वी रात्री 9:15 वाजेपर्यंत सुनावणी पार पाडली.

दरम्यान, या प्रकरणांची सुनावणी संपल्यानंतर न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड (DY Chandrachud) यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे (Employees) आभार मानले. शुक्रवारी या खंडपीठाने 10 तास 40 मिनिटे सुनावणी घेतली. दसऱ्याच्या सुटीपूर्वी शुक्रवार हा शेवटचा कामकाजाचा दिवस होता. खटला पुढे ढकलणे म्हणजे 'दीर्घ प्रतीक्षा'. गेल्या महिन्यात 16 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणावर संध्याकाळी 7.45 पर्यंत सुनावणी केली होती.

या वर्षी जुलैमध्ये, विद्यमान मुख्य न्यायाधीश यूयू लळित यांनी सकाळी 9.30 वाजता प्रायोगिक तत्त्वावर त्यांच्या न्यायालयात (Court) सूचीबद्ध प्रकरणांची सुनावणी सुरु केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, मुले सकाळी 7 वाजता तयार होऊन शाळेत जाऊ शकतात, तर मग आम्ही लवकर न्यायालयात का येऊ शकत नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा निवृत्त होणार? BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी अफवांवर दिलं स्पष्ट उत्तर; 'हिटमॅन'बाबतचा संभ्रम दूर

Sonia Gandhi on Students Protest: 'विद्यार्थ्यांना शत्रू मानतं मोदी सरकार'! 'नीट' पेपरफुटीवरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Horoscope: एकादशीचा शुभ मुहूर्त! 'या' राशींचे नशीब उजळणार; आर्थिक लाभासह करिअरमध्ये यशाचे संकेत

Goa Youth Protest: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

SCROLL FOR NEXT