The 81-year-old murderer was finally arrested after absconding the police for four decades. Dainik Gomantak
देश

एक दोन नव्हे, तब्बल चार दशके पोलिसांना गुंगारा, 81 वर्षांचा खुनी अखेर जाळ्यात

जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीनंतर एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपी सतत आपली ओळख बदलून 40 वर्षे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला. मात्र, आता वयाच्या 81 वर्षे हा खुनी पोलिसांच्या जाळ्यात आलाच.

Ashutosh Masgaunde

The 81-year-old murderer was finally arrested after absconding the police for four decades:

जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात एका व्यक्तीचा खुन झाला होता. त्यानंतर आरोपी शिवराज सिंह सतत वेश बदलून आणि आपली ओळख लपवून 40 वर्षे पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र पोलिसांनी नुकतेच 81 वर्षांच्या आरोपीला अटक केली आहे.

फिरोजाबाद पोलिसांनी सिंह याला मध्य प्रदेशातील इंदूरमधील हिरा नगर येथून अटक केली, आता तो 81 वर्षांचा आहे, जेथे तो आपली ओळख लपवून मिठाईच्या दुकानात काम करत होता.

मे 1982 मध्ये, उत्तर प्रदेशातील रामगढ पोलीस ठाण्यांतर्गत थारपुथा परिसरातील रहिवासी असलेल्या बदन सिंह यांना जमिनीच्या वादातून बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये बदन सिंह यांचा मृत्यू झाला.

शिवराजसह सात जणांना पोलिसांनी सुरुवातीला अटक केली होती. मात्र, त्या प्रत्येकाला जामीन मिळवण्यात यश आले.

खटल्यादरम्यान सहा आरोपींचा मृत्यू झाला, तर जामिनावर सुटलेला शिवराज घर आणि इतर मालमत्ता विकून बेपत्ता झाला होता.

रामगडचे एसएचओ रवी त्यागी म्हणाले, "कोर्टाने शिवराजविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. पोलीस गेल्या चार दशकांपासून त्याचा शोध घेत होते. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक पोलिसांना आरोपीबाबत कोणतीही माहिती देत नव्हेत."

"अलीकडेच, आम्ही त्याच्या दोन विवाहित मुलींशी संपर्क साधला, ज्या दिल्ली आणि इंदूरमध्ये स्थायिक आहेत. त्यांच्याकडून गोळा केलेली माहिती आणि तांत्रिक संसाधनांचा वापर करून, शिवराजला अखेर शोधून अटक करण्यात आली," असे पुढे त्यागी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT