sam pitroda Dainik Gomantak
देश

'मंदिरे लोकांना रोजगार देऊ शकत नाहीत', सॅम पित्रोदा यांच्या विधानावर भाजप आक्रमक, मालवीय म्हणाले...

मालवीय यांनी त्यांच्या ट्विटरवर अकांउटवरुन याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Rajat Sawant

'राम आणि हनुमानाच्या मंदिरांमुळे नोकऱ्या निर्माण होणार नाहीत,' असे वक्तव्य इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केले आहे. पित्रोदा यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून धार्मिक बाबींवर लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप देखील केला आहे.

पित्रोदा यांच्या क्तव्यावरून भाजप आक्रमक झाले असून, भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवर पित्रोदा यांच्यावर टिका केली आहे. मालवीय यांनी त्यांच्या ट्विटरवर अकांउटवरुन पित्रोदा यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

पित्रोदा सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत अमिरिकेत आहेत. दरम्यान एका कार्यक्रमात पित्रोदा यांनी बोलताना केलेल्या वक्तव्यावरून वाद होत आहे. 'आपण बेरोजगारी, महागाई, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या समस्यांशी संघर्ष करत आहोत. याबाबत काहीही बोलले जात नाही पण राम, हनुमान आणि मंदिराबद्दल सगळे बोलतात. मंदिरे रोजगार निर्माण करणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून धार्मिक बाबींवर लक्ष केंद्रित करत आहेत.' असा आरोप पित्रोदा यांनी केला आहे.

यावरून भाजप नेते अमित मालवीय यांनी पित्रोदा यांच्यावर पलटवार केला आहे. 'राजीव गांधींचे सहकारी सॅम पित्रोदा जितके हुशार आहेत तितकेच अज्ञानी आहेत... भारताला सल्ला देण्याची गरज नाही. एप्रिल 2023 मध्ये भारतातील किरकोळ महागाई 4.7% पर्यंत खाली आली आहे, जी 18 महिन्यांतील सर्वात कमी आहे. त्या दृष्टीने घाऊक महागाईही चांगली आहे.'

'भारताची महागाई अमेरिकेच्या तुलनेत खूपच कमी आहे. पित्रोदा राहत असलेल्या देशातील शिक्षण, आरोग्य आणि रोजगार व्यवस्था त्यांनी पाहावी. तिथल्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे.' असे ट्विट मालवीय यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: अन्वर शेख हत्या प्रकरण; सर्व संशयितांची निर्दोष सुटका

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर फसली 'थार'; नागालँडच्या राजधानीतला व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT