drinking alcohol party Dainik Gomantak
देश

धक्कादायक! तेलंगणातील विद्यार्थ्यांची दारु पार्टी, चौकशी सुरु

तेलंगणातील (Telangana) मंचेरियल जिल्ह्यातील सरकारी निवासी शाळेतील शालेय विद्यार्थ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

तेलंगणामधील (Telangana) मंचेरियल जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सरकारी निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. दांडेपल्ली येथील बीसी बॉईज निवासी शाळेत ही धक्कादायक घटना घडली. जिथे दहावीच्या विद्यार्थ्यांचे (Students) निरोप समारंभाच्या पार्टीदरम्यान बिअर पितानाचे फोटो काढण्यात आले. या विद्यार्थ्यांना वसतिगृहात फेअरवेल पार्टीचे आयोजन करायचे होते. (Telangana students of 10th class were seen drinking alcohol at the party)

विकास अधिकारी, भगवती यांच्या म्हणण्यानुसार, "विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या वॉर्डनकडे उन्हाळी सुट्टी सुरु होण्यापूर्वी निरोप समारंभ आयोजित करण्याची परवानगी मागितली होती. परंतु विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाच्या कार्यक्रमात मद्य प्राशन केले."

दरम्यान, 17 एप्रिल रोजी या विद्यार्थ्यांनी पार्टीचे आयोजन केले होते. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गावात राहणाऱ्या त्यांच्याच मित्रांकडून दारुचा पुरवठा करण्यात आला.

तथापि, काही अतिउत्साही विद्यार्थ्यांनी त्यांच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केले. त्यानंतर बघता-बघता ते फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले. दुसरीकडे, जिल्हा प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे तात्काळ आदेश दिले आहेत.

दुसरीकडे, हैदराबाद (Hyderabad) पोलीस हवालदाराला या प्रकरणात बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस कोठडीत असताना चेन्नईतील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने न्यायालयीन चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT