Telangana Chief Minister KCR  Dainik Gomantak
देश

'शेतकरी सरकार बदलू शकतात': तेलंगणा मुख्यमंत्री

शेतकरी सरकार बदलू शकतात असे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर पंजाबमध्ये म्हणाले.

दैनिक गोमन्तक

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना आणि गेल्या वर्षी शेतकरी आंदोलनात मारले गेलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंजाबमध्ये आहेत. पंजाबमध्ये त्यांनी शेतकरी नेत्यांना आवाहन केले की, 'जोपर्यंत पिकांच्या आधारभूत किमतीला घटनात्मक हमी मिळत नाही, तोपर्यंत केंद्राविरोधात आंदोलन सुरु ठेवावे.' "शेतकरी सरकार बदलू शकतात," असेही ते म्हणाले.

यावेळी प्रमुख शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) उपस्थित होते. राकेश टिकैत हे गेल्या वर्षी वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या नेत्यांपैकी एक होते.

खतांच्या वाढत्या किमती, "दोषपूर्ण" MSP आणि इंधनाच्या किमतींसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन त्यांनी केंद्रावर वारंवार हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनात प्राण गमावलेल्या 600 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांनी संबोधित केले, श्रद्धांजली वाहिली आणि सहानुभूती व्यक्त केली. तेलंगणा (Telangana) सरकारने आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 3 लाख रुपयांची भरपाईही जाहीर केली आहे.

दुसरीकडे, आपल्या सरकारच्या (Government) कामगिरीवर प्रकाश टाकताना केसीआर म्हणाले की, तेलंगणाच्या स्थापनेपूर्वी शेतकरी अत्यंत संकटात होते. दररोज अनेक लोक आत्महत्या करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT