Crime Dainik Gomantak
देश

हैवानियत! शिक्षिकेवर चार नराधमांनी केला बलात्कार, Police तपास सुरु

Crime News: प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षिकेवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला.

दैनिक गोमन्तक

Kanpur Rural: कानपूर ग्रामीण भागातील एका गावात बुधवारी सकाळी प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षिकेवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला. शिक्षिकेच्या तक्रारीवरुन चारही आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, कोतवाली परिसरातील रहिवासी असलेल्या सरकारी शिक्षिकेने पोलिसांना सांगितले की, 'मी बुधवारी सकाळी स्कूटीवरुन शाळेत जात होती. यादरम्यान, भोगनीपूर येथील रहिवासी संजय पाल, अनीस पाल, देवेंद्र आणि दीपक या चार जणांनी मला रस्त्यात अडवले. यानंतर सर्वांनी मला तोंड दाबून ओढत जवळच्या शेतात नेले, आणि तिथे माझ्यावर बलात्कार केला.'

यानंतर हे सर्वजण जीवे मारण्याची धमकी देऊन ​​पळून गेले. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडित शिक्षिकेने 112 क्रमांकावर पोलिसांना (Police) या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. शिक्षिकेने कोतवालीत चार आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली, त्यावरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

दुसरीकडे, रात्री उशिरापर्यंत एकाही आरोपीला (Accused) अटक होऊ शकली नाही. कोतवाल राजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, 'शिक्षिकेच्या तक्रारीवरुन चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या शिक्षिकेला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात (Hospital) पाठवण्यात आले आहे.'

शिवाय, शिक्षिकेच्या तक्रारीवरुन चार जणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात दोन्ही पक्षांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. चर्चेच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

SCROLL FOR NEXT