Tamil Nadu Explosion Twitter/ @ANI
देश

Tamil Nadu: विरुधुनगरमधील फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट, 9 जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु

तामिळनाडूतील शिवकाशीजवळ फटाके बनवणाऱ्या कारखान्यात मंगळवारी एकापाठोपाठ दोन स्फोट झाले.

Manish Jadhav

तामिळनाडूतील शिवकाशीजवळ फटाके बनवणाऱ्या कारखान्यात मंगळवारी एकापाठोपाठ दोन स्फोट झाले. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिला स्फोट विरुधुनगर जिल्ह्यात झाला.

अग्निशमन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. दुसरा स्फोट त्याच जिल्ह्यातील कम्मापट्टी गावात दुसऱ्या युनिटमध्ये झाला. या स्फोटांमुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे.

9 ऑक्टोबरलाही स्फोट झाला होता

याआधी 9 ऑक्टोबरलाही तामिळनाडूच्या (Tamil Nadu) अरियालूर येथील फटाक्याच्या कारखाण्यात स्फोट झाला होता. या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये 3 महिला होत्या. ही घटना वेत्रियूर मदुरा विरागुलर गावात घडली होती.

या प्रकरणी कारखान्याचे मालक राजेंद्र आणि त्यांचा जावई अरुण कुमार यांना अटक करण्यात आली आहे. दिवाळीमुळे इतर 30 कामगारांना कामावर ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते, जे ओव्हरटाईम करत होते.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, पाच जखमींना तंजावर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (Hospital) दाखल करण्यात आले होते. मदत कार्य तात्काळ पोहोचवण्यासाठी त्यांचे कॅबिनेट सहकारी एसएस शिवशंकर आणि सीव्ही गणेशन यांना तैनात केले होते.

त्यांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रुपये, गंभीर जखमींना 1 लाख रुपये आणि सामान्य जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT