England vs West Indies 2nd T20 Dainik Gomantak
देश

England vs West Indies: इंग्लंड विरूध्द वेस्ट इंडिज सामन्याने रचला अनोखा 'विश्वविक्रम', टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'हे' घडलं

England vs West Indies 2nd T20: इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १६ गडी गमावून १९६ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने १८.३ षटकांत ६ गडी गमावून १९९ धावा करून सामना जिंकला.

Sameer Amunekar

England vs West Indies

इंग्लंड विरूध्द वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा ४ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात असा एक पराक्रम घडला आहे, जो टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे. वेस्ट इंडिजने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १६ विकेट्सच्या मोबदल्यात १९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने १८.३ षटकांत ६ विकेट्सच्या मोबदल्यात १९९ धावा करून सामना जिंकला.

या सामन्यात एकूण ३७४ धावा झाल्या, परंतु विशेष बाब म्हणजे दोन्ही संघांतील एकाही खेळाडूने वैयक्तिकरित्या ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या नाहीत. टी-२० क्रिकेट इतिहासात प्रथमच असं घडलं असून, कोणत्याही फलंदाजानं अर्धशतक न करता सर्वाधिक धावा झालेला टी-२० सामना असा एक आगळावेगळा विक्रम या सामन्याच्या नावावर नोंदवला गेला आहे.

यापूर्वी, २०२४ मध्ये बेल्जियम आणि ग्वेर्नसे यांच्यातील सामन्यादरम्यान कोणत्याही वैयक्तिक खेळाडूनं ५०+ धावा न करता टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा रचल्या गेल्या होत्या. दोन्ही संघांनी एपत्रितपणे या सामन्यात एकूण ३७१ धावा केल्या होत्या.

वैयक्तिक ५०+ धावा न करता टी-२० सामन्यात सर्वाधिक धावा

  • ३७४ धावा - इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, २०२५*

  • ३७१ धावा - बेल्जियम विरुद्ध ग्वेर्नसी, २०२४

  • ३६५ धावा - न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, २०१३

  • ३५१ धावा - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, २०२४

  • ३४९ - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, २००७

याशिवाय, दुसऱ्या टी-२० सामन्यात जोस बटलरने ३६ चेंडूत ४७ धावा केल्या. बटलरने ४७ धावा करून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक खास विक्रम केला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा बटलर जगातील चौथा फलंदाज बनला आहे.

रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. रोहितने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ४,२३१ धावा केल्या आहेत. बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर आहे. बाबरने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एकूण ४,२२३ धावा केल्या आहेत.

टी-२० मध्ये कारकिर्दीतील सर्वाधिक धावा

  • ४,२३१ – रोहित शर्मा (१५१ डाव)

  • ४,२२३ – बाबर आझम (१२१ डाव)

  • ४,१८८ – विराट कोहली (११७ डाव)

  • ३,६६८ – जोस बटलर (१२५ डाव)

  • ३,६५६ – पॉल स्टर्लिंग (१४७ डाव)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT