Swing Fell in Mohali | Video Dainik Gomantak
देश

Video: जत्रेत 50 फूट उंचीवरून खाली कोसळला पाळणा, 15 हुन अधिक जण जखमी

Swing Fell in Mohali : जत्रेत 50 फूट उंचीवरून खाली पाळणा कोसळला असुन या घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाबमधील मोहाली येथे रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. शहरातील फेज 8 येथील दसरा मैदानाच्या जत्रेत पाळणा पडल्याने 16 जण जखमी झाले. त्यापैकी बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतेक जखमींच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. अपघातानंतर स्विंगचा ऑपरेटर आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मोहालीच्या फेज 8 च्या दसरा मैदानावर लंडन ब्रिज फेअर सुरू आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने जत्रेत मोठी गर्दी होती. ड्रॉप टॉवर स्विंग अचानक 50 फूट उंचीवरून खाली कोसळल्याने जत्रेत एकच खळबळ उडाली आहे. कोणी काही करण्याआधीच झुल्यासह त्यातील लोक जमिनीवर कोसळले. अपघाताच्या वेळी 30 हून अधिक लोक झुल्यावर होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही सहभाग होता. एक चांगली गोष्ट म्हणजे झुल्यावरील लोकांनी पट्टा बांधला होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

दुर्घटनेनंतर पाळण्याचा मालक आणि कर्मचारी फरार

या घटनेत 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच काही पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर जखमींना तेथून बाहेर काढण्यात आले. मेळा स्थळी आयोजकांकडून कोणत्याही प्रकारची रुग्णवाहिका किंवा प्रथमोपचाराची व्यवस्था नव्हती. अपघात झाला तेव्हा चेंगराचेंगरी झाली.अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी जत्रेत मोठी गर्दी होती. हा अपघात कसा झाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरु असून त्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT