Swiggy Delivery Boy  Dainik Gomantak
देश

Swiggy Delivery Boy : डिलिव्हरी बॉयचा मंदिर परिसरात Non-Veg देण्यास नकार, मग काय घडलं?

नॉनव्हेज जेवणाची ऑर्डर मंदिराच्या आवारात जाऊन देण्यास नकार देणाऱ्या डिलिव्हरी बॉयला स्विगीने नोकरीवरुन काढून टाकले होते.

दैनिक गोमन्तक

Swiggy Delivery Boy: फूड डिलिव्हरी करणारी स्विगी सध्या चर्चेत आली आहे. नॉनव्हेजची ऑर्डर मंदिराच्या आवारात जाऊन देण्यास नकार देणाऱ्या डिलिव्हरी बॉयला स्विगीने नोकरीवरुन काढून टाकले होते.पण त्याचा मंदिर प्रशासनाने सत्कार केला आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेउया.

हे प्रकरण दिल्लीमधील आहे. कश्मीरे गेट येथे असलेल्या बाबा हनुमान मंदिर परिसरात नॉनव्हेज ऑनलाइन ऑर्डर देण्यास नकार दिल्याने सचिन पांचाळ या डिलिव्हरी बॉयला नोकरीवरुन काढण्यात आले होते. त्याने गेल्या आठवड्यात एक व्हिडिओ पोस्ट करत ही घटना सांगितली होती. त्या तरुणाचा मंदिरातील पुजाऱ्यांनी सन्मान केला आहे. 

सचिनने आपल्या व्हिडिओत म्हटले होते की, डिलिव्हरी बॉय मंदिराच्या बाहेर उभा होता आणि ग्राहकाला सांगत होता की त्याने मंदिराच्या बाहेर येऊन ऑर्डर घ्यावी. पण ग्राहक बाहेर न आल्याने त्याने मंदिराच्या आवारात जाऊन नॉनव्हेजची डिलिव्हरी देणे नाकारले होते. 

व्हिडिओमध्ये सचिन मंदिराच्या गेटबाहेर हातात ऑर्डर घेऊन उभा असल्याचे दिसते. डिलिव्हरी लोकेशन यमुना बाजार, हनुमान मंदिर दाखवत होते. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या बिलानुसार ही घटना 1 मार्च 2023 ची आहे.

ग्राहकाच्या दारापर्यंत अन्न पोहोचवणे हे स्विगी बॉयचे काम असते. मात्र सचिन पांचाळने हे केले नाही म्हणून स्विगीने त्याला कामावरून काढून टाकले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी मार्गघाट हनुमान मंदिराच्या पुजाऱ्यांनी मंदिराचे धार्मिक पावित्र्य राखल्याबद्दल सचिनचा सत्कार केला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT