भारतीय क्रिकेटचा ‘मिस्टर ३६० डिग्री’ म्हणून ओळखला जाणारा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आज आपला ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या तो टीम इंडियाच्या सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये गणला जातो. आपल्या आक्रमक आणि चौफेर फटकेबाजीच्या जोरावर सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
सूर्यकुमार अजूनही भारतीय टी-२० संघाचा कर्णधार असून त्याची ब्रँड व्हॅल्यू सतत वाढत आहे. क्रिकेट कारकिर्दीबरोबरच सूर्यकुमार आता भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये आपले स्थान पक्कं करत आहे.
गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने सूर्यकुमारला ८ कोटींना कायम ठेवले होते. मात्र आयपीएल २०२५ पूर्वी मुंबईने त्याच्यावर तब्बल १६.३५ कोटी रुपयांचा पैज लावला. २०११ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करताना त्याचे वार्षिक वेतन फक्त १० लाख रुपये होते, तर आज तो कोट्यवधींची कमाई करणारा स्टार बनला आहे.
बीसीसीआयच्या ताज्या केंद्रीय करारात सूर्यकुमार ‘बी श्रेणी’ मध्ये असून, त्याला दरवर्षी ३ कोटी रुपये मानधन मिळते. याशिवाय, कसोटीसाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख आणि टी-२० सामन्यासाठी ३ लाख रुपये तो वेगळे मिळवतो.
२०२५ पर्यंत सूर्यकुमार यादवची एकूण मालमत्ता सुमारे ५५ कोटी रुपये इतकी झाली आहे. यामध्ये आयपीएल व बीसीसीआयचे मानधन, जाहिराती आणि ब्रँड डील्सचा मोठा वाटा आहे.
त्याचे चेंबूरमधील अनुशक्ती नगरमध्ये आलिशान घर असून तिथेच त्याच्याकडे दोन आलिशान अपार्टमेंट्स आहेत. या अपार्टमेंट्सची किंमत अंदाजे २१ कोटी रुपये असल्याचे ‘मॅन्सवर्ल्ड’च्या अहवालात म्हटले आहे.
रिअल इस्टेट व्यतिरिक्त सूर्यकुमारकडे बीएमडब्ल्यू, ऑडी ए-६, मर्सिडीज आणि टोयोटा फॉर्च्युनर यांसारख्या महागड्या गाड्यांचा कलेक्शन आहे.
क्रिकेटसह सूर्यकुमार ब्रँड व्हॅल्यूमुळेही मोठी कमाई करतो. ड्रीम११, रॉयल स्टॅग, रिबॉक, मॅक्सिमा वॉचेस, सरीन स्पोर्ट्स यांसारख्या नामांकित ब्रँड्ससोबत त्याचे करार आहेत. प्रति ब्रँड डील तो ६० ते ७० लाख रुपये इतकी रक्कम घेतो.
सूर्यकुमार यादवनं २०११ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएल प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर २०१४ ते २०१७ दरम्यान तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. २०१८ मध्ये तो पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि आजही या संघाचा कणा मानला जातो.
आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने २०२१ मध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर तो झपाट्याने भारतीय टी-२० संघाचा महत्त्वाचा भाग बनला. सध्या तो या स्वरूपात टीम इंडियाचे नेतृत्व करीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.