Surya Grahan 2023 |Solar Eclipse  Dainik Gomantak
देश

Solar Eclipse 2023: वर्षातील पहिले सूर्यग्रहण सुरू; जाणून घ्या भारतावर काय होईल परिणाम

आज सकाळी 07.05 वाजता वर्षातील पहिले सूर्यग्रहण झाले असुन दुपारी 12.29 वाजता संपेल.

दैनिक गोमन्तक

Solar Eclipse 2023: यंदाचे पहिले सूर्यग्रहण आज पहाटे सुरु झाले आहे. हे ग्रहण सकाळी 07.05 वाजता सुरु झाले असुन दुपारी 12.29 वाजता संपेल. हे ग्रहण अश्विनी नक्षत्रात मेष राशीत आहे. 

वैज्ञानिकदृष्ट्या, सूर्यग्रहण ही खगोलीय घटना मानली गेली आहे, परंतु ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण शुभ मानले जात नाही. ग्रह आणि नक्षत्रांच्या बदलाचा राशींवरही परिणाम होतो.

त्याचप्रमाणे सूर्यग्रहणाचाही सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. हे सूर्यग्रहण कसे असेल आणि कुठे दिसेल ते जाणून घेऊया.

  • या ठिकाणी सूर्यग्रहण दिसणार

वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण कंबोडिया, चीन, अमेरिका, मायक्रोनेशिया, मलेशिया, फिजी, जपान, सामोआ, सोलोमन, बरुनी, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, तैवान, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, फिलीपिन्स, दक्षिण हिंद महासागर, येथे पाहता येईल.

  • सूर्यग्रहण कसे असेल?

सूर्यग्रहण नेहमी अमावस्या तिथीला होते. आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण आणि वैशाख अमावस्या आहे. सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत. एक म्हणजे संपूर्ण सूर्यग्रहण ज्याला खग्रास सूर्यग्रहण असेही म्हणतात.

दुसऱ्या आंशिक सूर्यग्रहणाला खंडग्रास सूर्यग्रहण आणि तिसऱ्याला कंकणकृती सूर्यग्रहण म्हणतात. याला कंकणाकृती ग्रहण असेही म्हणतात. आजचे सूर्यग्रहण हे संकरीत सूर्यग्रहण आहे. विज्ञानाच्या भाषेत याला संकरित सूर्यग्रहण असेही म्हणतात. 

हे सूर्यग्रहण जगातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात दिसणार आहे. आजचे संकरित सूर्यग्रहण हे दुर्मिळ सूर्यग्रहण आहे कारण ते क्वचितच दिसते.

या दिवशी काही ठिकाणी अंशत: सूर्यग्रहण दिसणार आहे, तर काही ठिकाणी ते पूर्णपणे दिसणार आहे. आणि काही ठिकाणी ते कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणून दिसेल. म्हणूनच याला संकरित सूर्यग्रहण म्हणतात.

सूर्यग्रहण पाहतांना कोणती काळजी घ्यावी

  • विशिष्ट चष्म्यामधून पाहावे सूर्यग्रहण

सूर्यग्रहण हे थेट पाहिल्याने डोळ्यांना इजा होऊ शकते. सूर्य प्रकाशातील अतिनील किरणे ही डोळ्यांमध्ये कॉर्निया या नाजूक भागाला इजा पोहोचवू शकतात.

यामुळे दृष्टिदोष निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे सोलार एक्लिप्स गॉगलमधूनच हे ग्रहण पाहावे.

  • एक्सरेमधून पाहू नका

अनेक लोक एक्स रे फाइल्ममधून हे ग्रहण पाहतात. पण असे केल्यास डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. यामुळे विशिष्ठ चष्मा अवश्य वापरावा.

  • या गोष्टींचा वापर करुन सूर्यग्रहण पाहू नये

काही लोक हे साध्या दुर्बिणीमधून सूर्यग्रहण पाहतात. मात्र असे करु नये. तसेच काळ्या काचा, साधे गॉगल, अल्युमिनियम पेपर, कॅमेरा किंवा भिंग यांमधून सूर्य ग्रहण पाहू नका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT